दिशाशक्ती प्रतिनिधी / रमेश खेमनर : मुंबई मधील कांदिवली उपनगरातील जेष्ठ पत्रकार कवी, लेखक, व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार २०२३ करीता निवड करण्यात आली असल्याचे निवड पत्र भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच च्या संस्थापिका भाग्यश्री बागड यांनी भारत कवितके यांना देऊन अभिनंदन केले आहे.
रविवार दिनांक १ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता स्वामी नारायण मंदिर,अक्षर महोल, तिथलं, बलसाड, गुजरात या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना सदर पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात येणार आहे.भारत कवितके यांना पत्रकारिता, साहित्य,व सामाजिक क्षेत्रात आजवर दिल्ली, गुजरात,मध्य प्रदेश,गोवा, उत्तर प्रदेश,व महाराष्ट्र अशा विविध राज्यातून विविध संस्था चे पुरस्कार प्राप्त झालेले असून भारत कवितके यांची पुरस्कार संख्या आता पर्यंत १०४३ झाली आहे.
महाराष्ट्रातील भारत कवितके यांना गुजरात राज्यातून पुरस्कार मिळण्याची ही सातवी वेळ आहे. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, चष्मा वाटप, श्रवणयंत्र वाटप,ई श्रम कार्ड शिबीर, रुग्णांना रुग्णालयांनी सेवेत मदत करणे, वृक्षारोपण, पर्यावरण समतोल राखण्यासाठी जनजागृती करणे, वगैरे वगैरे कार्यक्रम भारत कवितके राबवित असतात, महाराष्ट्र राज्यातील अनेक दैनिक , साप्ताहिक, मासिक दिवाळी अंकातून भारत कवितके यांचे साहित्य, बातम्या प्रसिद्ध होत असतात.आतापर्यंत त्याची सात पुस्तके प्रकाशित झाली असून सर्वच पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.भारत कवितके यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला.त्याबदल त्यांचेवर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे.
भारत कवितके यांची सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार२०२३ करीता झाली निवड

0Share
Leave a reply