बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार :बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुगावचे सहशिक्षक शंकर हासगुळे यांचे वडील व बळीराम हासगुळे यांचे बंधू गागलेगाव येथील रहिवासी कै.विठ्ठलराव पाटील हासगुळे यांची पुण्यतिथी दरवर्षी किर्तन भजन व प्रवचन आध्यात्मिक कार्यक्रमानी साजरी करून आदरांजली वाहिले जाते पण यावर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतुने बारावी पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले हे वकृत्व स्पर्धा दुगांव ता.बिलोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते.
सर्वप्रथम कै. विठ्ठलराव पाटील हासगुळे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सदरील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पहिली ते चौथी लहान गटात 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मोठ्या गटामध्ये एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. आठ गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये लहान गटातून सर्वप्रथम अनुजा लक्ष्मण नांगरे, दुतीय विश्वनाथ माधवराव जाधव, तृतीय सुशांत माधव शेळके, उत्तेजनार्थ बक्षीस महीम मुस्ताक सय्यद, हिवराळे परसराम प्रमोद, दुर्गा धोंडीबा इबितवार, पृथ्वीराज गजभारे, सयाजी विलास नरवाडे, तर पाचवी ते सातवी मोठ्या गटामधून प्रथम आरती चंद्रकांत शिंदे, द्वितीय सुप्रिया संतोष डोंगळे, तृतीय रोहिणी हाणमंत शिंदे, उत्तेजनार्थ अश्विनी उमराव जाधव, सुमय्या महमूद शेख, विशाखा तिरुपती हिवराळे, स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्री.बीएम पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून कौठकर शि.वि.अ लोलमवाड सर के. प्र. निळकंठ चोंडे जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा.शिक्षक संघ रमेश घुमलवाड उपग्रेड मु.अ.मारोती खैरगावे बालाजी कदम व्यंकट साळुके शंकर पाटील जाधव ज्ञानेश्वर कदम उमराव जाधव नागोराव साळुंके बळीराम हासगुळे इरवंत याताडे गुणवंत हलगरे परिक्षक म्हणून प्रा.खनपट्टेसर व संदीप टाकळे सर उपस्थित होते.
यावेळी गंगाधर शिंदे मु.अ, किशोर पायरे, माधव शिकारे, राजेश शिंदे, कलबुर्गी सर ,राहुल कदम, संजय शिंदे, मारोती तमन्ना व गावातील सरपंच, उपसरपंच प्र शालेय समितीचे अध्यक्ष विघार्थी गावकरी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवराज पवार व संतोष गंडेवाड यांनी तर आभार कैलास काळेवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मोहन तोगरवाड पवार सर काळेवाड सर मॅडम रेड्डी धुळशेट्टे मॅडम पाशाभाई आदींनी प्रयत्न केले.या सर्वांचे हासगुळे परिवाराकडून मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
Leave a reply