प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर ) : तालुक्यातील ढोकी येथील पठाण वस्ती या परिसरामध्ये शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याचा परिसरामध्ये वावर असल्याने घबराविशेषटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत.सलग दोन ते तीन दिवसापासून बिबट्या हा पठाण वस्ती परिसरातच असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वनविभागाला कळवूनही फॉरेस्ट अधिकारी बिबट्या जेरबंद करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असुन दखल घेतली जात नाही. पठाण वस्ती परिसरात राहणाऱ्या भाऊसाहेब शिंदे या शेतकऱ्याच्या पाळीव घोड्यावर बिबट्याने हल्ला केला व यामध्ये घोडा हा जखमी झाला आहे. जखमी घोड्यावर उपचार करण्यात आले आहेत.
हा हल्ला बिबट्यानेच केला आहे असे शिंदे यांनी सांगितले. घोड्यावर हल्ला झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास नऱ्हे यांनी
टाकळी ढोकेश्वर येथील वन अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांनी त्या भागात येऊन पंचनामा केला आहे.बिबट्या हा वारंवार या भागातील काही शेतकऱ्यांना दिसून येत आहे तसेच प्राण्यांवर हल्ला करत असल्यामुळे शेतकरी कष्टकरी वर्गामध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
सामाजिक कार्यकर्ते कैलास नऱ्हे, माजी उपसरपंच कलीम पठाण, माजी सरपंच संतोष तमनर, राजू पठाण, निसार शेख, नजीर पठाण, सकलेन पठाण, अरबाज पठाण, माजी चेअरमन हुसेन पठाण, युवा सहकारी समीर पठाण, नवनाथ वाकचौरे, जब्बार पठाण, भैय्या पठाण, या सर्वांनी हा घडलेला प्रकार वनविभाग प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आहे तरी पठाण वस्ती हा परिसर मोठा परिसर आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. तरी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रशासनाने तातडीने या भागामध्ये पिंजरा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे.