लातूर प्रतिनिधी / नंदराज पोले : महाराष्ट्रातील धनगर समाजास केंद्र सरकारने एस.टी.प्रवर्गात आरक्षण द्यावे, यासाठी आज लातूर तालुक्यातील महमदापूर पाटी (लातूर-नांदेड महामार्ग) येथे धनगर समाजाच्या वतीने शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे व महसूल विभागाचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी श्री.गवळी व तलाठी श्रीमती पुरी यांनी आरक्षणाची मागणी करणारे निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्रातील विविध समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणावर गाजत आहे.यात विविध जाती धर्माच्या आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन होताना पाहावयास मिळत आहे. तसेच धनगर समाजास एस.टी.आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पु.अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीसह महाराष्ट्रात सर्वत्र आरक्षण मागणीने जोर धरला आहे. दरम्यान याच मागणीसाठी महमदापूर पाटी येथे धनगर समाजाचे नेते रमेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली समस्त धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून उपस्थित मान्यवरांनी आरक्षण मागणी संदर्भाने मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी धनगर समाजाचे नेते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक ॲड.संभाजीराव सूळ, ॲड.मंचिकराव डोणे, बलभीम जाडकर, अनिल गोयकर, चंद्रकांत हजारे, ॲड.अनिरुध्द येचाळे, आदिनाथ मुळे, धनाजी भंडारे, अभिजीत मदने, रमाकांत बसपुरे, सुभाष भंडे,लक्ष्मण मुळे,दत्ता सुरवसे, यशवंत मुळे, गोविंद सुरवसे, वैजेनाथ दिवटे,बालाजी सुरवसे,नागनाथ लांडगे,गंगाधर कोरे,ज्ञानोबा शिंदे,अर्जून निंगुळे व महमदापूरसह लातूर शहर, मुरुड, बोरी, भातांगळी, भातखेडा, बामणी, सलगरा, मुशीराबाद, बोकनगाव, कासारखेडा आदी गावातील कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस.टी.आरक्षणासाठी धनगर समाजाचे महमदापूर पाटी येथे शेळ्या मेंढ्या सह रास्ता रोको आंदोलन…….

0Share
Leave a reply