Disha Shakti

क्राईम

बेलापूर दरोडा प्रकरणी धक्कादायक खुलासा दरोड्याचा बनाव करून पत्नीनेच केला पतीचा गळा दाबून खून

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : बेलापूर-उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात नईम रशीद पठाण या बॅटरी व्यवसायिक तरुणाचा दरोड्यात खून झाल्याचा बनाव करून त्याच्या पत्नीने त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बुशरा नईम पठाण, वय 27 असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

बेलापूर येथील बॅटरी व्यवसायिक नईम रशीद पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईम पठाण यांचा खून केला. नईम यांच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी आहेत. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र दरोडेखोर आले याचा काही मागमुस पोलिसांना मिळाला नाही. शिवाय इतक्या रात्री बुशराने बंगल्याचा दरवाजा का उघडला? याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. नाईनचा मृतदेह बेडवर होता. तेथे झटापट झाल्याची चिन्हे नव्हती. शिवाय त्याच्या पँटच्या खिशात चाळीस हजार रुपये होते. दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेले. मग त्याच्या खिशातील चाळीस हजार रुपये का नेले नाही? असाही प्रश्न पडला.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नातेवाईकांची चौकशी केली. नईमची पत्नी बुशरा हीची तिची ननंद नसीम मुजफ्फर शेख यांच्या समक्ष चौकशी केली. त्यावेळी तिने दरोड्याचा बनाव करून आपणच खून केल्याची कबुली दिली. पती नईनम अनैसर्गिक कृत्य करून तिचा छळ करत असे. त्यामुळे तिने त्याला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन नंतर खिडकीला साडी बांधून त्याच्या साह्याने गळा वळल्याची कबुली तिने दिली. पोलिसांनी आज सकाळी तिला ताब्यात घेतले आहे.

या महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय होण्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, हवालदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रवींद्र कर्डिले, सागर ससाने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चालक गावडे, महिला पोलीस सरग यांच्या पथकाने ही कामगिरी केली.दरम्यान गुन्ह्याचा तपास करण्याचा पोलिसांवर दबाव होता.आरोपींचा शोध लागत नाही तोवर अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका देखील नईमच्या नातेवाईकांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर एका रात्रीत होण्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!