विशेष प्रतिनिधी /इनायत आत्तार : कोपरगांवला शाळेत असतांना पहिल्यांदा आळदीला जाण्याचा योग आला,कोपरगांवची बरीच भक्त मंडळी होती ,त्या वेळी बस गाड्यांचा प्रवास दुर्मिळ होता , रेल्वेने गेल्याचे आठवते, तेथे तेल्याचे धर्म शाळेत ऊतरलो होतो,माऊलीचे पहिले दर्शन झाले ,इंद्रायणीत स्नान झाले,दिंड्या पताका आणि टाळांचा गजर पाहून हरकून गेलो होतो, आळंदी माणसांनी फुलून गेली होती,जत्रेत गाडगे बाबा आले होते,त्यांचे बरोबर भक्त जनाचा मोठा ताफा होता,
नदीवरील पुला जवळ धर्मशाळे समोर मोकळी जागा होती, बाबा सह सर्व भक्त झाडूने पटांगन झाडून घेत होते,कुणी दर्शनाला वाकला की झाडूने झोडपीत होते, कोपरगांवला दर पोळा सणाच्या आदल्या दिवसी जूना मोटार स्टँडवर कैकाडी बाबाचे किर्तन होत असे ,तेथेच एकदा गाडगे बाबाचे किर्तन ऐकले होते,मला बाबाचे आकर्षन होते.
एकादशीचे दिवसी तेली मठात ह,भ प सोनोपंत दांडेकर यांचे प्रवचन होते ,ते वारकरी संप्रदायाचे विद्वान व अभ्यासू किर्तनकार होते,त्याच वेळी समोरच्या पटांगणात गाडगे बाबाचे किर्तन होते,मी बाबाच्या किर्तनाला जाणे पसंत केले,पुण्यात असतांना सायकल वरून आळंदीला अनेकदा गेलो,नंतरही अनेकदा गेलो, पण माऊलीचे पहिले दर्शन अतिशय आनंददायी होते !
————————–
अस्वस्थ वर्तमान !आज मध्यरात्री १२-००० वाजता वयाची ८३ वर्षे पुर्ण होत आहेत आणि ८४ वे वर्ष सुरु होत आहेत, याला रूढार्थाने वाढदिवस म्हणतात पण आमच्या दृष्टिने हे काऊंट डाऊन चालू आहे,काही थोडे अपवाद वगळता आयुष्य आनंदातच गेले,याचे कारण माझे कुटुंब ,मला भेटलेले भेटलेलेले मित्र , आणि मला भेटलेली पत्नी ,स्वाभिमान वाटावा असा मुलगा व सुन आणि मुली जावयी, नातवंडे शिक्षक,साखर कारखान्यात टाईम व लेबर,जन संपर्क अधिकारी असी आवडत्या क्षेत्रात नोकरी,जोडीला लेखन वाचनाची आवड,साहित्याच्या क्षेत्राने दिँलेले सन्मान !सगळं आयुष्य आनंदाने ओतप्रोत भरलेलं होतं ,
सेवा निवृत्त झाल्या नंतरही सामाजिक कार्य चालूच होते,ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा, प्रवासी संघटना,महाराष्ट्र साहित्य परिषद ,बाल सुधार गृह संस्थेचे सेवाभावी कामकाज चालूच होते ,पुर्ण वेळ कसा जात असे कळत नसे,१८ सप्टेंबर २०१५ हा दिवस ऊजाडला आणि आयुष्य भरच्या आनंदाला क्षणात घेऊन गेला , एकाकी करुन गेला, माझे आस्तित्व संपले,मी परावलंबी झालो,माझं घर सुटलं , मी मुलाचे घरी गेलो सुसज्ज निवास ,कुठलीच कमतरता नाही,काळजी घेणारा मुलगा व सून ,नियमीत संपर्क साधणारे लेक जाव्ई ,मित्र , पण तो आनंद नाही, गाव छोटं खेडं,पेपर नाही,सर्व शेतकरी,दिवस भर शेतात राबून थकून भागून घरी येणारे, भरपुर माणसं असूनही माझे जीवन निर्मनुष्य असलेले, टि व्ही वरच्या निरस बातम्या ,वाचून संपलेली पुस्तके व धर्मग्रंथ , गजबजलेल्या आयुष्यान नंतर अचानक आलेलं रिकामंपण खायला ऊठतं आहे ,डिसेबर २०१७ ते फेब्रूवारी २०१८ या काळात मुंब्ईत महागड्या हाँस्पिटल मध्ये अत्यवस्थेत होतो,मीही जाण्या साठी ऊत्सूक होतो,पण मृत्यूने चकवा दिला,वेटिंग वर ठेवले, माझे निकटचे अनेक सहकारी केव्हाच पोहचले आहेत ,आता हा वेटिंग पिरीयेड किती दिवस आहे कुणास ठाऊक ?
Leave a reply