विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज (शुक्रवार) दुपारी १२ वाजता धनगर समाजाच्यावतीने नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना सक्रीय पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील ढोकी फाटा नगर कल्याण महामार्गावर सखल धनगर समाजाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी गंगाराम कोळेकर, संतोष तमनर,कैलास नऱ्हे , मारुती खटके, निलेश खटके, बाबासाहेब नऱ्हे, बाळासाहेब नऱ्हे,बापू नऱ्हे, दिलीप मोरे,छबू खटके, अण्णासाहेब धरम, बाबासाहेब धरम,सयाजी खटके, प्रशांत धरम, संतोष धरम यांच्यासह ढोकी, धोत्रे, ढवळपुरी, गाजदिपुर, पळशी, तिखोल, कासारे कोहकडी आदी गावातील ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर- कल्याण महामार्गावरील ढोकी येथे मेंढपाळांसह आंदोलकांनी सुमारे तासभर रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. येत्या चार-पाच दिवसांत सरकारने आरक्षणाबाबत कोणताही तोडगा न काढल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू,असा इशारा आंदोलकांनी दिला. या रास्ता रोको मुळे नगर- कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात येऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.
धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आमदार निलेश लंके यांनी धनगर बांधवांच्या प्रेमापोटी तळमळीने काम करत आहेत. धनगर समाजाची अस्मिता असणाऱ्या भंडाऱ्याचा सन्मान फक्त लोकनेते आमदार निलेश लंके करू शकतात. भविष्यातही धनगर समाजाच्या पाठीमागे अखंडपणे राहणार आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं! म्हणत भंडाऱ्याने पिवळे झालेले नेतृत्व म्हणजे निलेश लंके साहेब हे आहेत. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने बाळासाहेब खिलारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
Leave a reply