नांदेड जिल्हा प्रतिनिधी/मिलिंद बच्छाव : सरकारच्या नव्या जिआर नुसार नायगाव तालुक्यातील सर्व तलाठी कर्मचाऱ्यांनी आपापल्या सज्जाला मुक्कामी राहावे सज्जाला न राहिल्या मुळे शेतकरी वर्गाला संकटाना सामोरे जावे लागत आहेत तरी सर्वाना आपल्या मार्फत सूचना देऊन सज्जाला मुक्कामी राहण्याचे आदेश द्यावे अन्यथा मुक्कामी न राहिल्यास तहसील कार्याल्यावर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन छावा तर्फे देण्यात आले.
निवेदनावर साई पाटील मोरे प्रताप पाटील कदम रावसाहेब पाटील शिंदे हणमंत पाटील शिंदे चंद्रकांत पाटील होटाळकर बंटी पाटील शिंदे अजिंक्य पाटील कल्याण रितेश पाटील कल्याण गजानन पाटील कदम सतीश पाटील कदम आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. नायगाव तालुका छावा संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिल्या निवेदनामध्ये नवीन जीआरमध्ये तलाठी मुक्कामी न राहिल्यास छावा स्टाईलने सर्व तालुक्यातील तलाठ्याचा समाचार घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
तलाठी कर्मचारी सज्जाला मुक्कामी रहाण्याबाबत नायगाव तालुका छावा संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन..

0Share
Leave a reply