श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचे चेअरमन दत्ताभाऊ खेमनर यांना डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट कडून हवामान तज्ञ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ सुनील दिंडे व डॉ सागर पवार यांनी दिले आहे.
दत्तात्रय खेमनर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सहा तारीख ते दहा तारीख मुसळधार पाऊस होईल असा हवामानाचा अंदाज हवामान खाते व हवामान तज्ञ पंजाबराव डंक या दोघांना चॅलेंज करून केला होता त्यांनी हा पाच तारखेला व्हिडिओ अपलोड केला होता सहा तारखेला संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली सहा तारखेला मुंबई नाशिक धुळे मालेगाव या भागात प्रचंड पाऊस झाला त्यानंतर त्यांनी नाशिक नगरचा हवामान आंदाज दिला होता या भागात देखील प्रचंड पाऊस झाला दत्तात्रय खेमनर यांनी आजपर्यंत दिलेले सर्व हवामानाचा अंदाज तंतोतंत खरे ठरले त्यांनी हवामानावर केलेला अभ्यास याची दखल घेऊन त्यांना हवामान तज्ञ पुरस्कार डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट देण्यात येणार आहे अशी माहिती डॉ दिंडे यांनी दिली आहे.
दत्तात्रय खेमनर हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना पाच एकर बागायत शेती आहे त्यांचे वडील स्वर्गीय पोपटराव खेमनर हे देखील शासनाच्या प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित झालेले होते त्यांच्या मातोश्री सौ लताबाई पोपटराव खेमनर यांना देखील नुकताच राज्यस्तरीय कृषी भूषण हा पुरस्कार मिळाला आहे सुंदर कुटुंबी हे पहिल्यापासून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात त्यांच्या मातोश्री यांनी एकाच शेतात पाच वेगळी पिके घेतली होती आंतरपीक पिकाचा गाडा अभ्यास त्यांचा आहे.
दत्तात्रय खेमनर व्यवसायाने पत्रकार आहे त्यांचं स्वतःचं दैनिक खबरदार पुढारी हे वृत्तपत्र आहे ते धार्मिक क्षेत्राशी निगडित आहे देशभरातील साधुसंतांची त्यांची चांगली जवळीक आहे त्यांना हा हवामान तज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल महायोगी शिवशक्ती कालिदास बाबा हरियाण बालयोगी महेश्वरानंद महाराज कोल्हापूर जगद्गुरु स्वामी अरुणाथ गिरी महाराज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भारतीय अन्न महामंडळाचे संचालक बापूसाहेब शिंदे भाजपा प्रदेश प्रवक्ते नितीन जी दिनकर भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील भाजपा तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पठारे जि प सदस्य शरदराव नवले उपसभापती बाळासाहेब तोरणे भाऊ डेव्हलपरचे संचालक प्रसाद म्हसे पाटील उद्योजक मच्छिंद्र अण्णा कांडेकर उद्योजक सुदाम अण्णा लोंढे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भैया भिसे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजीत लिफटे यांनी अभिनंदन केला आहे
Leave a reply