राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सणाचे पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच गुन्हेगारांना धाक आणि सर्वसामान्यांना पोलीस प्रशासनाबाबत विश्वास निर्माण व्हावा यासाठी राहुरी तालुक्यातील उमरी गावात आणि राहुल शहरांमधील गणपती विसर्जन मार्गावर शीघ्र कृती दलाकडून पतसंचालन करण्यात आले.
शीघ्रकृती दलाचे अपर पोलीस अधीक्षक आलोक कुमार झा, उपविभागीय अधिकारी विशाल एरंडे तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक अर्चना कुमारी, पोलीस निरीक्षक सुशीलकुमार पोलीस, उपनिरीक्षक विशाल पाखरे आदींच्या मार्गदर्शनाखाली हे पतसंंचालन करण्यात आले. सकाळी राहुरी तालुक्यातील उंबरे येथे शीघ्र कृतीतील पथक अचानक पोहोचले असता नागरिकांमध्ये माहिती झाले असता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला मात्र गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दलाचे पथकाचा रोडमार्च असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचे निष्वास सोडला.
राहुरी शहरातही पथक पोहोचल्यानंतर गणपती विसर्जन मार्गावर वाय एम सी ग्राउंड मल्हार वाडी चौक शनी चौक आझाद चौक मडगली आझाद चौक शनी मंदिर शिवाजी चौकेश्वर चौक या ठिकाणी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सु-व्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने रॅपिड ॲक्शन फोर्स (शीघ्र कृती दलाने रूट मार्च केले. यामध्ये ३० पोलीस अंमलदार, १० नवीन पोलीस अंमलदार, ४० होमगार्ड, शीघ्र कृती दलाच्या १०५ जणांच्या तुकडीसह १ अँडिशनल एसपी, ३ डीवायएसपी, ६ पीआय याशिवाय राहुरी पोलीस ठाण्याचे पीआय धनंजय जाधव, पोलीस अधिकारी उनवणे, पाटील, कटारे, जाधव सह राहुरी पोलीस होमगार्ड हे देखील या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.
Leave a reply