Disha Shakti

Uncategorized

संगमनेर येथील सुपुत्र अजीजभाई मोमीन यांची शिर्डी व अहमदनगर आरोग्य सेनेच्या लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती

Spread the love

शेख यूनुस / अहमदनगर प्रतिनिधी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या राज्य स्तरावरुन नुक्त्याच जाहिर करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभाग आरोग्य विभागा मध्ये सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत ची सरकारची असणारी ध्येय धोरने सरकारच्या असणाऱ्या आरोग्य विषयक योजना आपल्या मतदारापर्येत पोहचवन्याचे काम हे आरोग्य विभागामार्फत केले जाते.शिर्डी व अहमदनगर आरोग्य सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी अजीज याक़ूब मोमीन, संगमनेर यांची नियुक्ती केल्याचे पत्र शिव आरोग्य सेनेचे कार्या ध्यक्ष डॉक्टर श्री.किशोर ठाणे कर यांनी जारी केले आहे.

अजीज मोमीन यांच्या या निवडी बद्दल शिवसेना संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा, आणि नांदेड़ सह महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पदा धिकारी यांच्या वतीने माननीय अजीजभाई मोमीन यांचे सादिक भाई शेख हेल्थ क्लब ग्रुप च्या वतीने व सर्व स्तरातुन् अभिनंदन आणि स्वागत यांचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!