देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सूरनर : पोलीस मित्र सुरक्षा परिषद इंडिया दिल्ली, भारत प्रदेश अंतर्गत देगलूर तालुका अध्यक्षपदी अमोल कुमार शिंदे यांची निवड करण्यात आली. सविस्तर वृत्त , महाराष्ट्रातील जिल्ह्यातील व तालुक्यातील सामाजिक उपक्रम, उत्सव, अशा अनेक ठिकाणी राज्यातील पोलीस कार्यरत असतात कर्तव्य बजावत असतात, 24तास सेवा देत असतात, पण त्यांच्या या कार्यात सहकार्य म्हणून पोलीस मित्र सुरक्षा परिषदेतील, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी, त्यांना सहकार्य करणार असून, व सामाजिक कार्यात सेवा देण्याच्या हेतूने प्रयत्न करणार आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे तर देगलूर तालुका अध्यक्षपदी अमोल कुमार शिंदे यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे ध्येयधोरण, जबाबदारी आपल्या संघटनेचे महत्त्व लक्षात घेऊन, पोलीस व नागरिक यांना मदत करून पोलीस मित्र म्हणून पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करतील करतील अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.अमोल कुमार शिंदे यांना देगलूर तालुका अध्यक्ष जबाबदारी देण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शी साळुंखे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर ना शितोळे,यांच्या वतीने जबाबदारी देण्यात आली आहे. व नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोदरे यांच्या आदेशानुसार तसेच भोकर तालुका अध्यक्ष चंद्रकांत स्वामी मुस्तापुरे यांच्या हस्ते अमोल कुमार शिंदे यांची देगलूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले व देगलूर शहरासह देगलूर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Leave a reply