धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : निराधार विधवा महिलांना बजाज फायनान्स आणि बंधन यांच्या संयुक्त विद्यमाने तेर शाखेच्या वतीने दोनशे महिलांना रोजगार निर्मितीचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. तेर सह परिसरातील ढोकी, तडोळा, गोरेवाडी, ढोराळा, भंडारवाडी, उपळा, किनी, बुकनवाडी, हिंगळजवाडी, मुळेवाडी अशा अनेक गावातील महिलांना व्यवसाय साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
बजाज फायनान्स आणि बंधन यांच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 शाखा असून जिल्ह्यात तीन हजार निराधार विधवा महिलांना शिलाई मशीन, पिठाची चक्की, पिको फॉल मशीन, किराणा व स्टेशनरी साहित्य , साडी व्यवसाय, बांगड्या ,झाडू विक्री, शूज सेंटर, कुक्कुटपालन, शेळीपालन असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून स्वतःसह कुटुंबाची जबाबदारी पार पाडून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक साहित्य वाटप करून बजाज फायनान्स आणि बंधनने समाजात आदर्श निर्माण करून निराधार विधवा महिलांना आधार देण्याचे काम केले आहे.
यावेळी परिसरातील निराधार महिला व बंधनचे संस्थेचे शाखा प्रभारी पर्वत सिंग राठोड व क्षेत्र समन्वयक विधान शहा,दयानंद गणेश कावळे यांची उपस्थिती होती.
Leave a reply