जिल्हा प्रतिनिधी / शेख युनूस : भाजप युवा मोर्चच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी माजी मंत्री व जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव पैलवान अक्षय कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करून अध्यक्षपदी निवड केली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांचे विविध प्रश्न अक्षय कर्डिले यांनी हाती घेऊन सोडवले असून केंद्र व राज्य सरकारच्या युवकांसाठी विविध योजना असून त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगाच्या पाठीवर देशाचे महत्व सिद्ध करून दिले आहे. भारत देश हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रयत्न करत आहे. अक्षय कर्डीले यांना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा जन सेवेचा वारसा लाभलेला असून तो जन सेवेचा वारसा पुढे सुरळीत आणि सुरक्षित जोपासला जात आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले हे जनतेत जाऊन प्रश्न सोडविण्यासाठी आघाडीची भूमिका बजावताना नेहमी दिसतात आणि त्या साठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात.
अक्षय कर्डीले यांना युवा मोर्चाच्या दक्षिण जिल्ह्य अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी आपल्या कामा च्या माध्यमातून पार पडावी. युवकांना समाजामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध आहेत त्या संधीचे सोने करून घेण्याची धमक आणि जिद्द, चिकाटी ही युवा नेते अक्षय कर्डीले यांच्यात आहे.तडफदार व्यक्तिमहत्व असलेले अक्षय कर्डीले यांच्या संपर्कात युवकांनी पुढाकार घेऊन सामान्य जनतेला न्याय आणि हक्काची प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे आणि जनतेच्या मनात विश्वास संपादन करावा असे प्रतिपादन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले म्हणाले की, पक्षाने माझ्यावर पक्ष संघटनेची फार मोठी जबाबदारी टाकली आहे ती प्रामाणिक पणे पार पाडेल, युवकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करेल आणि ग्रामीण भागातील युवकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू. माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून आता थेट जनतेपर्यंत जाण्याचे काम आपण करीत आहोत असे अक्षय कर्डीले म्हणाले.
यावेळी उपस्थित माजी खासदार कै. दादा पाटील शेळके यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शेळके यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अंकुश पाटील शेळके, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे, दिलीप भालचंद्र आदी पत्रकार बंधू, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय कर्डीले यांच्या या भाजपा यूवा मोर्चाच्या पदी निवड झाल्याने अक्षय कर्डीले यांचे अहमदनगर जिल्ह्यातून अभिनंदन आणि स्वागत होत आहे.
Leave a reply