नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नांदेड जिल्ह्यातील पीजीआर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस बियाणे औषधीची विक्री करून अमाप पणे लूट केली जात होती,असे शेतकरी पुत्र गजानन पाटील चव्हाण यांना कळाल्यानंतर या बोगस पीजीआर कंपन्याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला असल्याने त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्वरित जीआर काढून सदर कंपन्यावर कार्यवाही केल्यामुळे पीजीआर कंपन्यावर प्रशासनाचा हातोडा पडला आहे.
याबाबत वृत्त असे की, पी जी आर कंपन्यांनी आपल्या कंपन्यामधून गैरकारभार चालवीत आपलेच चांगभलं करीत शेतकऱ्याची अमाप लुट करीत असताना याबाबत गजानन पाटील चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने आवाज उठवून दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी रीतसर पीजीआर कंपन्या विरोध कारवाई करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालकासह कृषिमंत्री व संबंधित अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले होते त्या निवेदनाची दखल त्वरीत शासनाने घेतली असून नांदेड जिल्ह्यातील अनेक कंपन्या विरूध जीआर काढले तर नांदेड येथील ओमकार बायोटेक, लिफ लाईफ कंपनी, ऍग्रो सोल, ग्रीन वर्ल्ड नरसी येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्र आणि कृष्णुर येथील हानीब ऍग्रो हैदराबाद, ऍडमिशन फर्टीलायझर ,नंदिग्राम ऍग्रो या कंपन्यातील बोगस बियाणे औषधीचा पंचनामा नांदेड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने केलेला आहे.
तसेच विविध कंपन्या फुटूरा ऍग्रो केमिकल, राधा गोविंद फर्टीलायझर अँड केमिकल लिमिटेड, सह्याद्री ऍग्रो, एक्सपर्ट बायो सायन्स, जिओ क्रॉपटेक, हिंदुस्तान क्रॉप सायन्स, सह इतर दहा ते बारा कंपन्याचा पंचनामा चालू आहे असे समजते, निवेदनकर्त्य शेतकरी पुत्र गजानन पाटील चव्हाण, किशोर महाराज धर्माबादकर, साईनाथ इबितदार यांनी या बोगस कंपन्याचा पर्दाफाश करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवाज उठविल्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक बोगस कंपन्यावर प्रशासनाचा हातोडा पडला आहे.
Leave a reply