Disha Shakti

सामाजिक

देगलूर पंचायत समितीच्यावतीने स्वच्छता ही सेवा “कचरा मुक्त भारत” अभियानाबाबत जनजागृती रॅली

Spread the love

देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सूरनर : पंचायत समिती देगलूर, जिल्हा नांदेड यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा कचरा मुक्त भारत “स्वच्छता रण” रॅली दी.२५ सप्टेंबर २०२३ रोजी मा. गटविकास अधिकारी श्री. शेखर देशमुख यांच्या नेतृत्वात खाली काढण्यात आली.

यावेळी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, श्री. भांबळे साहेब, श्री. सुनील भोपाळकर, श्री. कपिल कळसकर, श्री.बाळासाहेब शिंदे, श्री.सय्यद तयाब, श्री मुद्दिराज, ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष श्री. सुरेश चप्पलवार, श्री. शेख पाशा, श्री. पांढरे, श्री. वरखिंडे, श्री.अंकमवार, मानव्य विकास विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक श्री. कपाळे, श्री.मोरे, श्री.हिरेमठ, श्री. हावरगेकर. केंद्रप्रमुख श्री. सूर्यवंशी, श्री. स्वामी, श्री. पांढरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा कचरामुक्त भारत हा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!