नायगाव प्रतिनिधी / साजीद बागवान : दि 23/09/2023 रोजी महाराष्ट्र राज्य महामार्ग माळकोटा मनूर इज्जतगाव ते कारेगाव धर्माबाद हा जाणाऱ्या रस्त्यावरती होत असलेले काम पूर्णता निष्क्रिय दर्जाचे असून या रोडवरती किमान दीड ते दोन फुटाची माती टाकून दबई करून समस्त शेतकरी बांधवांसह जनतेची वाहतूक करणाऱ्या प्रवाशी यांच्या जीवाशी जीवित खेळी खेळत आहेत. तसेच दिनांक 23 / 09 /2023 रोजी जनहितार्थ विविध कामानिमित्त प्रवास करत असताना गजानन पाटील चव्हाण यांना हा सर्व प्रकार हे होणारे बोगस काम लक्षात आले लक्षात येतातच नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण सह या राज्य महामार्गालगत असलेल्या दरेगाव, ईळेगाव, हंगिर्गा, मनूर, सिंगणापूर भवानी इजतगाव, पट्टी इज्जतगाव, बळेगाव, कोडगाव, बिजेगाव, यंडाळा माहाठी, कारेगाव, पिंपळगाव सह धर्माबाद या भागातील सर्व शेतकरी मजदूर कामगार बांधव सह प्रवासी यांच्या सोबत चर्चा केली असता त्या संबंधित सर्व गावातील शेतकरी बांधवांची सर्वसामान्य लोकांना त्रासाला सामोरे जाऊन जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.
या भागातील सर्व जनतेसोबत चर्चा करत असताना संबंधित मा जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक नांदेड व संबंधित इंजिनियर सह कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून या रस्त्यावरती मुरमाच्या ऐवजी दोन फुटाची असलेली माती टाकण्यात आली होती ती तात्काळ काढून दोन ते तीन फुटाचा मुरूम टाकून नंबर एक दर्जाचे काम घेऊन या जनहितार्थ विषयांमध्ये लक्ष घ्यावेत अशी मागणी भागातील सर्व जनतेची आहे.
या विषयावरती योग्य दर्जाचे काम होत नसेल तर नाईलाजास्तव भागातील सर्व प्रवासी व जनते सह गजानन पाटील चव्हाण हे रस्त्यावर उतरणार व संबंधित प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्ट दारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत अशी मागणी तथा आव्हान जनतेतून तथा गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे
शेतकरी बांधवांसह जनतेची व वाहतूक करणाऱ्या प्रवाशी यांच्या जीवाशी जीवित खेळी चालणार नाही – गजानन पाटील चव्हाण

0Share
Leave a reply