Disha Shakti

राजकीय

ग्रामपंचायतने लिलाव केलेल्या झाडांच्या रकमेचा भरणा गायब ; ग्रामस्थांची चौकशी करण्याची मागणी

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण  (पारनेर) : पारनेर तालुक्यातील कासारे येथिल ग्रामपंचायत कार्यालयात हद्दीतील पाझर तलावातील झाडे मा. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशानुसार झाडे तोडणीसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार पाझर तलाव क्र.१ मधील (इंजाईली) झाडांपासून निघणाऱ्या जळाऊ लाकडांचा जाहीर लिलाव दि.२० जुलै २०२२ रोजी ग्रामपंचायत कासारे येथिल नियोजित जागी नियम व अटी मान्य करून गावातील पंचासमोर पार पडला होता. त्यानुसार लिलावातील सहभागी झाल्या संबंधित ठेकेदाराला

बोली प्रमाणे लिलाव भेटल्यावर ५० टक्के रक्कम लिलावाच्या दिवशीच सांगितल्याप्रमाणे जमा करावी लागेल अशी अट घातलेली होती. संबंधित ठेकेदाराने (२,३०५००) रूपयांची उच्चतम बोली बोलून लिलाव घेतला व त्यानंतर कोणीही बोली बोलले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला २,३०५०० रुपयांना लिलाव देण्यात आला. व लिलाव रककमे पोटी त्यांनी रक्कम अदा करून वाहतूक करण्यात यावी. प्रमाणे अट नं. पाच लिलावातील नियमानुसार ५० टक्के रक्कम ठेकेदाराने त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत देण्यात यावी व उर्वरित रक्कम दोन दिवसांत जमा करून माल वाहतूक करण्यात यावी व पुर्ण (१००%) रक्कम ठेकेदाराने रोख स्वरूपात किंवा चेक स्वरुपात प्राप्त होत नाही तोपर्यंत मालाची (सरणाणाची) वाहतूक करण्यात येऊ नये रक्कम रोख किंवा चेकने प्राप्त झाल्यानंतर रितसर वाहतूक करण्यात यावी असे लिलावात नमुद केले आहे.

संबंधित लिलावधारक यांनी खात्यात जमा केले नाही. असे कासारे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून सांगण्यात आले. कासारे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी या लिलावाची रक्कम दोन लाख तीस हजार पाचशे रुपये ग्रामपंचायतने लिलाव केलेल्या झाडांच्या भरणा रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा केलेली नाही सदर रक्कमेची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शंकर नाना कासुटे, उपसरपंच व ग्रामस्थांनी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पारनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लिलाव केलेल्या झाडांच्या भरणा रकमेची चौकशी करून कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसांत ग्रामपंचायत कार्यालयासमोर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन ग्रामस्थांसह आमरण उपोषणाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!