राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने गेले २१ दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे सुरू असलेले उपोषण आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने महाजन यांनी येत्या ५० दिवसांमध्ये धनगर आरक्षणाबाबत कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल, असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सरकारने घेतली सकारात्मक भूमिका
गेले २१ दिवस उपोषण करणारे अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर यांनी मंत्री गिरीश महाजन, आमदार राम शिंदे, प्रकाश शेंडगे, अण्णा डांगे यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन आपले उपोषण सोडले. उपोषण सुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपनवर आणि बंडगर म्हणाले, सरकारला आम्ही ५० दिवस निर्णय घेण्यासाठी दिलेले आहेत. मात्र, आज जरी उपोषण आंदोलन थांबलेले असले तरी एकूण मागणीसाठी असलेले आंदोलन यापुढेही सुरूच राहील.
Leave a reply