अमरावती प्रतिनिधी / आकाश मुंदाने : नांदगाव खंडेश्वर मधील फुलआमला या गावामध्ये ग्रामपंचायत फुलआमला व मदन महाराज विद्यालय तथा कमलदीप कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे मेरी माटी मेरा देश या उपक्रम अंतर्गत यात्रेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.रुपाली चंद्रकांत ऊमक हे असून प्रमुख अतिथी मा.उपमुख्य कार्यकारी धायगुडे जि.प.अमरावती मदन महाराज विद्यालयाचे तथा कमलदीप कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष कीर्ती अर्जुन सचिव राव सर तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नाटकर, सा.विकास अधिकारी रोडे, गटशिक्षण अधिकारी शेंडे मॅडम, केंद्रप्रमुख मेहरे सर, वीर जवान सतीश राऊत, प्राचार्य निलेश देशमुख, ग्रामसेवक चव्हाण मॅडम, पवार सर, सरदार मॅडम, हळदे मॅडम, उपसरपंच मंदा राऊत, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील योगेश खंडारे अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट गावातील प्रतिष्ठित नागरिक शामभाऊ मंत्री ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व गावकरी मंडळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून वीर जवान सतीश राऊत यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पोषण माह अभियान अंतर्गत स्वास्थ्य बालक स्पर्धेत दोन बालकांना पोषण फलहार देण्यात आले गावातील उत्कृष्ट घरकुल बांधकाम मधील प्रथम दृतिय तृतीय यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला गावामध्ये भव्य दिव्य रॅलीचे आयोजन केले त्यामध्ये बैलगाडी सजावट करून विद्यार्थ्यांनी वेशभूषण केले सांप्रदायिक हरिपाठ भजन मंडळ ढोलाचे भजन मंडळ सहभागी होऊन चौका चौकामध्ये नृत्यकला सादर केले त्यामध्ये गावकऱ्यांचा व विद्यार्थ्यांचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले गावातील प्रत्येक रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली गावामध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले कार्यक्रमामध्ये समस्त फुलआमला ग्रामपंचायत,गावकरी,कर्मचारी, उपस्थित होते.
Leave a reply