मुंबई कांदिवली प्रतिनिधी / भारत कवितके : नारी शक्ती वंदन अधिनियम मंजुरी च्या पार्श्वभूमीवर जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे संसदेत मंजूर करण्यात आले आहे,अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.
वहिदा रेहमान यांनी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपट सृष्टीत गाजवला आहे, जवळपास ९० चित्रपटात त्यांनी आपला दमदार, कसदार, अभिनय करून प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे.वहिदा रेहमान यांनी अभिनयाच्या जोडीला उत्कृष्ट नृत्याचा आविष्कार जोपासला होता.त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या सोबत अभिनेत्री व आईची ही भूमिका पार पाडली आहे.
कभी कभी चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी ची भूमिका केली आहे तर त्रिशूळ या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका पार पाडली आहे.प्यासा,कागज के फूल, गाईड, साहेब,बिवी और गुलाम, रेश्मा और शेरा,हे वहिदा रेहमान यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडले.देव आनंद सोबत गाईड,प्रेम पुजारी, दिलीप कुमार सोबत राम और शाम, आदमी, मनोज कुमार सोबत पत्थरके सनम, राज कपूर सोबत तिसरी कसम, राज कुमार सोबत निल कमल, राजेश खन्ना सोबत खामोशी, वगैरे वगैरे अभिनेत्यासोबत वहिदा रेहमान यांनी अभिनयाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
Leave a reply