प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ वासुंदे संचलित आदर्श विद्यालय पळसपुर, तालुका. पारनेर जिल्हा अहमदनगर या विद्यालयात एक विद्यार्थी -एक वृक्ष या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. वासुंदे गावचे भूमिपुत्र व एक दानशूर व्यक्तिमत्व श्री रामदास (शेठ) शंकर झावरे यांनी विद्यालयासाठी जवळपास 100 पेक्षा अधिक वृक्ष दिली.
शासनाच्या उपक्रमांतर्गत एक विद्यार्थी -एक वृक्ष अभियान विद्यालयांमध्ये राबवण्यासाठी विद्यालयातील शिक्षक ठुबे बी टी सर यांनी विशेष प्रयत्न केले तसेच वृक्ष लागवड यशस्वीपणे राबवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बर्वे पी एस सर, ज्येष्ठ शिक्षक मते डी बी सर, आहेर बि व्ही सर, भुतांबरे, एम जे सर, साळवे डि के सर, ठुबे एस एन सर, आहेर.ए.वाय सर, मोरे ए.आर सर तसेच आहेर बी.बी, थोरात भाऊसाहेब, घनदाट एस बी या सर्वांनी विशेष प्रयत्न केले.
Leave a reply