वसंत रांधवण / विशेष प्रतिनीधी (पारनेर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे निर्भिड पत्रकार दत्ता गाडगेसर यांना शिवतेज गृप बाभूळवाडेच्या वतीने” राज्यस्तरीय शिवतेज विकास पत्रकारीता पुरस्कार २०२३ ” हा पहील्या वर्षाचा पुरस्कार पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आला. दरवर्षी सामाजिक, धार्मिक, राजकीय पत्रकारीता, कला, क्रिडा साहीत्य, संगीत क्षेत्रामधे दमदार कामगिरी करणार्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
यावर्षी शिवतेज गणेश फेस्टीवल २०२३ मधे सन्मान पत्रकारीतेचा, या सदराखाली,पत्रकार संघाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष सुरेश खोसे पाटील,खजिनदार संतोष कोरडे,प्रसिध्दी प्रमुख विजय रासकर,जेष्ठ पत्रकार भास्कराव कवाद पत्रकार वसंत रांधवन, महेश शिंगोटे,संदिप गाडे, ज्ञानेश्वर लोंढे, आनंदा भुकन, संपत वैरागर, संदीप इधाटे,अविनाश भांबरे, सचिन जाधव, नितीन परंडवाल आदींसह सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. तसेच १०० शालेय विद्यार्थ्यांना दप्तरवाटप,महीलांना साडीवाटप आदी कार्यक्रमांचेही आयोजन आमदार निलेश लंके यांचे शुभहस्ते करण्यात आले होते.
गणेश फेस्टीवल मधे सुरवातीला आमदार निलेश लंके यांचे हस्ते व इतर १० मान्यवरांचे हस्ते गणरायाची आरती झाली. तब्बल १० ते १२ फुटी गणपतीची मुर्ती, आकर्षक सजावट,लाईट डेकोरेशन मुळे या गणपतीकडे लोकं आकर्षित होत आहेत.यावेळी दत्ता गाडगे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायच्या वतीने उपसरपंच बाळासाहेब नवले,सदस्य अविनाश जगदाळे प्रमोद खणकर, सविता जगदाळे,तंटामुक्त समीती बाभूळवाडेचे अध्यक्ष श्रीराम पवार यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले,शिवतेज मित्रमंडळाचे कार्य फार मोठे आहे.यांचे मार्गदर्शक संस्थापक ऍड.कृष्णाजी जगदाळे हे एक हायटेक व्यक्तीमत्व असुन,त्यांच्या बुध्दीची सर कुणालाच नाही.त्यांची प्रत्येक कामाची पध्दत हि वेगळी आणि हटके असते.यावर्षी पासुन त्यांनी व सहकार्यांनी राज्यस्तरीय शिवतेज विकास पत्रकारीता पुरस्कार २०२३ पासुन सुरु केला.पहीला पुरस्कार दिला.ती व्यक्ती निवडली तिपण पत्रकासारांसाठी अतिशय चांगले काम करणारे दत्ता गाडगे सर यांची.सर्व गुणांनी संपन्न असलेल्या सरांची निवड करताना सरांनी बातमीदारीमधे प्रामाणिकपणा, सत्यता आणि समाजाचे प्रश्न सोडवत लोकांना न्याय देता येईल अशी भूमीका कायम ठेवली.याच गुणांना हेरुन एका बुध्दीमान जेष्ठ पत्रकाराची या पुरस्काराची निवड शिवतेज गृपने केली हे सुध्दा एक वेगळेपणच आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राष्ट्र सह्याद्रीचे मुख्य समन्वयक व राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव दत्ता गाडगे म्हणाले,शिवतेज या नावामधेच सर्वकाही आले.शिवतेज गृपचे सर्वेसर्वा ऍड कृष्णाजी जगदाळे व सहकार्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार सुरु करताना प्रथम वर्षासाठी माझ्या नावाचा विचार केला याची मलाही कल्पना नव्हती.आणि गणेश फेस्टीवलमधे हा पुरस्कार मला दिला जातो.माझ्या सर्व पत्रकार बांधवांना सन्मानित केले जाते.परंतु जेव्हा मला पुरस्कारासाठी कळविले तेव्हा मनस्वी आनंद झाला.माझ्या पत्रकार बांधवांमुळेच मला चांगले काम करण्याची उर्मी येते.पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते या जबाबदारीचीही मला जाणीव आहे.माझा हा पुरस्कार मी माझ्या पत्रकार बांधवांना समर्पित करतो अशी भावना व्यक्त करत शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष,डि एम बोरुडे,कार्याध्यक्ष जुबेर पठाण, कार्यवाह अजिंक्यराज जगदाळे व सर्व सभासदांना धन्यवाद दिले.
या प्रसंगी शिवतेज गृपचे संस्थापक ऍड. कृष्णाजी जगदाळे, किसान सेनेचे तालुका प्रमुख गुलाबराव नवले, राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, युवानेते अनिल गंधाक्ते, बाजार समीतीचे माजी उपसभापती विलास झावरे, हत्तलखिंडचे सरपंच महेंद्र गायकवाड, हंगा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब साठे, बाभूळवाडेचे उपसरपंच बाळासाहेब नवले, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खणकर, अविनाश जगदाळे,सविता जगदाळे, शिवतेज गृपचे अध्यक्ष डि.एम बोरुडे, कार्यवाह अजिंक्यराज जगदाळे, कार्याध्यक्ष जुमेर पठाण आदी उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे,मुख्य संघटक संजय भोकरे,प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवतेज गृपचे संस्थापक ऍड.कृष्णाजी जगदाळे यांनी केले.आभार बाभूळवाडे गांवचे उपसरपंच बाळासाहेब नवले यांनी मानले.
Leave a reply