शेख युनुस / अ.नगर : अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग १६० नगर मनमाड़ वरील सावली विहिर ते नगर बायपास रस्ता तात्काल दुरूस्ती करून वाहतुक योग्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे अधिकारी आणि संबंधित यांत्राना दिले.
राज्याचे महसुल मंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबई मंत्रालय येथे महत्वाची बैठक पार पड़ली. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग १६० नगर मनमाड़ वरील सावली विहीर ते नगर बायपास रस्ता वाहतुकिसाठी सुयोग्य करण्याबाबत बैठकीत अहमदनगर चे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महासंचालक रस्ते आणि प्रकल्प संचालक डी. एस. झोड़गे, साईट अभियंता दिग्वीजय पाटनकर, साईट अभियंता ओ.जी. अनेराव, इंजिनियर महेश मिश्रा, बी. पी. सी.एल्चे मनोज शिगोटे, रूद्राणी इन्फ्राचे विवेक देशपांडे मनीषा कंट्रक्शन चे जी. एल. माने यांच्या सह संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a reply