अहमदपूर प्रतिनिधी / नंदराज पोले : महाराष्ट्र लोक विकास मंचची राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सुमठाणा येथील बालाजी शिंदे यांची लातूर जिल्हा प्रमुख पदी निवड झाली आहे. मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर यांनी एका पत्रकाद्वारे ही निवड जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोक विकास मंच (मलोविम) या सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या, स्वयंसेवी संस्थांच्या संघटनेची, सर्वसाधारण बैठक २१ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडली.
या बैठकीत मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर यांनी राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रीय कार्यकारणी पुढील प्रमाणे – राष्ट्रीय अध्यक्ष- विश्वनाथ आण्णा तोडकर (औरंगाबाद) राष्ट्रीय उपाध्यक्ष- एम. एन. कोंढाळकर (पुणे) राष्ट्रीय सचिव- भूमिपुत्र वाघ (धाराशिव) राष्ट्रीय कोषाध्यक्ष- मनीषा घुले (बीड)
राष्ट्रीय संघटक- रमाकांत कुलकर्णी (लातूर)
विभागीय प्रदेश अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र- अरुण जाधव (अहमदनगर) मराठवाडा विभाग- ओमप्रकाश गिरी (बीड) विदर्भ अमरावती विभाग बंडू आंबटकर (अमरावती) कोंकण विभाग (प्रभारी)- एम. एन. कोंढाळकर (पुणे) उत्तर महाराष्ट्र विभाग (प्रभारी)- पुष्कराज तायडे (जालना) जिल्हाध्यक्ष, बीड- बाजीराव ढाकणे लातूर- बालाजी शिंदे, जालना- पुष्कराज तायडे यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हा प्रमुखांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
Leave a reply