वसंत रांधवण / विशेष प्रतिनिधी : गेल्या दहा दिवसांपासून सर्वांचे लाडके देवता विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाची स्थापना प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या गावात स्थापना झाल्यामुळे आसपासच्या परिसरातील वातावरण उत्साहपूर्वक भक्तीमय होऊन गेले होते. गुरुवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी अनेक मंडळानी सकाळीच मिरवणूका काढत गणपती बप्पाचे विसर्जन करण्यात येत होते तर घरगुती बप्पाचे विसर्जन नागरिक जो तो आप आपल्या सोयीनी करत होते. दुपार नंतर व सांयकाळी पावसाने गणेश विसर्जन मिरवणुकीत हजेरी लावली आणि युवक वर्गाचा आनंद द्विगुणित झालेला दिसत होता.
तालुक्यातील टाकळीढोकश्वर येथिल श्री. संत सावतामाळी मित्रमंडळाने गावात रात्री सात वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीने सनई, ताशा पथक ढोलकी तालावर भर पावसातही मिरवणूक काढण्यात आली. भर पावसातही तरुणाई थिरकताना दिसत होती. तालुक्यातील अनेक मंडळांनी विसर्जन मुरवणुकांना ढोल ताशा लेझीम झांज या पारंपरिक वाद्या बरोबरच तालुक्यात अनेक ठिकाणी बॅंजोचा दणदणापट जोमात दिसत होता.
सांयकाळी पाच सहा नंतर ठिकठिकाणी पावसास सुरवात झाल्यावर काही ठिकाणी मिरवणूका थांंबल्या तर काही ठिकाणी उत्साही युवकांनी भर पावसात पारंपरिक पद्धतीने सनई, ताशा, ढोलकीवर ताल धरत बप्पा समोर मनसोक्त ठेका धरलेला दिसत होता. तालुक्यात अनेक ठिकाणी तरुणाई भर पावसात थिरकताना दिसत होती. सर्रास पणे दहा दिवसांच्या मुक्कामा नंतर गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने व वरुणराजाच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या बोलीवर पारनेर तालुक्यात बाप्पाला निरोप देण्यात आला.
टाकळीढोकश्वर मध्ये मोठ्या भक्तीभावाने गणपती बप्पाला निरोप ; विसर्जनावेळी पावसाची जोरदार हजेरी

0Share
Leave a reply