Disha Shakti

इतर

कोपरगाव येथील गोदावरी पुलावरून नदी पात्रात उडी मारून इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : कोपरगाव मध्ये गोदावरी पात्रतेत अंदाजे चार ते साडेचारच्या दरम्यान एका इसमाने गोदावरी पात्राच्या लहान पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या प्रयत्न केला आह़े. सदरील इसम पुलावर उभा असताना त्याजवळच काही नागरिक पुलावर उपस्थित होते परंतु सदरील इसमाने अचानक पुलावरून उडी मारल्याचे त्यांनी पाहताच त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तेथील नागरिक धावले व तात्काळ या इसमास पाण्याबाहेर काढून त्या इसमास कोपरगाव मधील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

सदरील व्यक्ती कोपरगाव येथील असून त्यांचे नाव सरफुद्दीन पठान असून सदरील व्यक्तीचे अंदाजे वय 50 ते 55 दरम्यान आहे. ही व्यक्ती संजय नगर तालुका कोपरगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आह़े. सदरील इसमाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळले आह़े सदरील इसमाचे आत्महत्या करण्याबाबतचे कारण समजू शकले नसून गोदावरी पुलावरील उपस्थित विजु मरसाळे, दिपक थोरात, सुषमा खिलारी, सोमनाथ थोरात, प्रविण मोरे यांनी त्या व्यक्तीस उडी मारताना पाहताच त्यांनी धाव घेऊन त्यास पाण्याबाहेर काढून तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्या इसमावर सद्या उपचार चालू आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!