प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे वाळू तस्करी ही होत असून येथील वाळू च्या लालच्या पोटी दोन निष्पाप मुक्या बैलांना करावे लागले. सविस्तर माहिती अशी कि, राहूरी स्टेशनं येथील रेल्वेच्या लोखंडी पुलाजवळ अनेक वर्षांपासून बैलगाडीच्या साहाय्याने खोल पाण्यातून वाळूचा उपसा करून रात्रीच्या वेळी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनातून वाळूची चोरटी वाहतूक केली जाते.
महसूल विभागात तक्रार आल्यावर कार्यवाही करण्यासाठी येतात, परंतु ती कार्यवाही तात्पुरती असल्याने वाळू उपसा हा पुन्हा जोमात सुरु होताना दिसतो. राहूरी तालुक्यातील रेल्वे स्टेशनं येथील अनेक दिवसापासून वाळू उपसा वाहतूक करण्याचा प्रकार सुरु असून नदीच्या पलीकडून म्हणजे पाण्यातील वाळू साधारण १० ते १३ फूट खोल पाण्यात फक्त बैलांचे तोंडच बाहेर असते आणि पाण्यातून वाळू बाहेर काढण्यासाठी बैल गाडी द्वारे वाळू काढून बाहेर आणली जाते आणि एका ठिकाणी वाळूसाठा करून वाळूची वाहतूक केली जाते.
वाळू वाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पलटी झाली मजूर हे पाण्यातून कसे बसे बाहेर पडले परंतु बैलगाडी पाण्यात उल्टी अडकून बसल्याने बैल गाडीला गळे बांधलेले असल्याने बैल पाण्यात बुडून मरण पावले. सुदैवाने वाळू भरणारे मजूर बैलगाडी व बैलासोबत पाण्यात अडकले नाही त्यामुळे त्यांचा जीव वाचला नाहीतर फार मोठा अनर्थ झाला असता. उपस्थित तरुण युवकांनी बैलांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु पाणी खोलवर असल्याने निष्पाप मुक्या बैलांना आपला जीव गमवावा लागला.
या दुर्दैवी घटनेचे काही प्राणी मित्रानी आणि राहूरी तालुक्यातील नागरिकांनी हळ हळ व्यक्त केली आहे.
राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात पाण्यातुन वाळू काढताना दोन बैलांचा पाण्यात बुडून मूत्यू

0Share
Leave a reply