Disha Shakti

राजकीय

अहमदनगर जिल्ह्यातील जो कारखाना 3500 दर देणार, त्यालाच ऊस देणार!

Spread the love

प्रतिनिधी / प्रशांत जोशी : जिल्ह्यातील साखर कारखाने येत्या गाळप हंगामात साडेतीन हजार रुपये टन दर देण्याच्या मानसिकतेत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर दिल्यास शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत,असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात साखरेचे दर बाजारात 3600 ते 3700 रुपये प्रतिक्विंटल पोहोचला आहे.या वाढीव धराचा लाभ कारखानदारांनी शेतकऱ्यांना, असे आवाहन औताडे यांनी केले आहे.

बेळगाव जिल्ह्यात 3500 ते 3700 रुपये प्रतिटन दर देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बेळगावशी ऊस दराची स्पर्धा करावी लागणार आहे. तेलंगणामध्ये ऊसाचे दर मागील तीन ते चार वर्षांपासून 3300 ते 3700 प्रतिटन आहेत.किमान याच धर्तीवर नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 3500 रुपये प्रतिटनच्या पुढे दर द्यावा.ऊस झोनबंदी कायदा रद्द झाल्याने जो कारखाना अधिक दर देईल, त्यांना ऊस पुरवठा करावा, असे औताडे यांचे म्हणणे आहे.यावर्षी जिल्ह्यात तीनशे मिलीमीटर इतके कमी पाऊस झालेला आहे.ऊसाचे उत्पादन प्रचंड घटले आहे.

मागील तीन वर्षे जिल्ह्यात अडीचशे लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता होती.ती निम्म्याहून कमी होऊन यावर्षी शंभर मॅट्रिक मनावर आलेली आहे.जिल्ह्यात एकूण 23 साखर कारखाने गाळपासाठी सज्ज असून 200 ते 224 लाख मेट्रिक टनाची आवश्यकता आहे.मागील दहा वर्षापासून संगनमताने प्रतिटन एक हजार रुपये दर शेतकऱ्यांना कमी देण्यात आल्याचा आरोप औताडे यांनी केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!