Disha Shakti

इतर

रेल्वेच्या नोटीशीला विरोध करत घर बचाव समितीचा मोर्चा

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनच्या उत्तर व दक्षिण बाजूस अनुक्रमे 125 मीटर व 91 मीटर इतकी हद्द रेल्वेची असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.त्यामुळे या रेल्वेलाईनच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यावसायिक, व्यापारी व घरांना रेल्वेने नोटीस बजावून ते खाली करण्याचे सांगितले आहे.त्यामुळे या विरोधात घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने श्रीरामपूर शहरात आज शनिवार दि.30 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाच्या अखेरीस श्रीरामपूर प्रांतकार्यालय मध्ये जाऊन प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या नागरिकांनी त्यांचे घर किंवा दुकान हे नगरपालिकेकडून अधिकृत करून घेतलेले आहे.भोगवटादार म्हणून नगरपालिकेत त्यांची नोंद लागलेली आहे.तसेच पाणीपट्टी ,घरपट्टी व विज बिल देखील हे नागरिक भारतात असे असताना त्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणावरून हटवणे म्हणजे त्यांच्यावर मोठा अन्याय आहे.त्यामुळे त्यांचे म्हणणे मांडण्यास त्यांना वेळ मिळावा व रेल्वेने नागरिकांवर अन्याय करू नये असे मोर्चात सहभागी नागरिकांचे म्हणणे आहे.या मोर्चाला सर्व पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!