दिशाशक्ती प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : तालुक्यातील वडगाव सावताळ सेवा सोसायटी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे. या सेवा सोसायटीची नुकतीच अध्यक्षपदाची निवड झाली असून, बाबासाहेब रावसाहेब दाते यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना सुचक कर्ण रोकडे, तर अनुमोदक दादाभाऊ आंबेकर होते. उपाध्यक्षपदी चंदकांत झिटे कायम आहेत. यावेळी हनुमंत ठाणगे, गणेश शिंदे, दादाभाऊ रोकडे, शिवाजी रोकडे, सचिन रोकडे, गो.या.रोकडे , सविता भोसले, सुभद्रा जाधव, पंढरीनाथ व्यवहारे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र वाघमोडे, तर सचिव विजय गायकवाड यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब दाते यांना अनुभव असून, हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदी बिनविरोध निवडून देण्याचा सर्व संचालकांनी निर्णय घेतला आहे. या सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादाभाऊ रोकडे यांनी संचालकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे एक वर्षाच्या आत मुदतपूर्व राजीनामा दिला. यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. बाबासाहेब दाते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष दाते याचे अभिनंदन केले.
वडगाव सावताळ सेवा सोसायटी शंभर टक्के वसुलीची परंपरा कायम ठेवणार, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करणार. सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, वर्गाला योग्य न्याय देवून नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.: बाबासाहेब दाते (अध्यक्ष, वडगाव सावताळ सोसायटी)
Leave a reply