Disha Shakti

क्रीडा / खेळ

श्रीरामपूर बास्केटबॉल टीमने देशाचे नाव उज्वल केले – डॉ.बसवराज शिवपुजे

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : जीवनामध्ये खेळायला अतिशय महत्त्व आहे. खेळाच्या माध्यमातून अनेक गोष्टी साध्य करता येतात. नोकऱ्यांमध्ये सुद्धा खेळाडूंना आरक्षण आहे.श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशनच्या टीमने नेपाळ येथे झालेल्या त्रिराष्ट्रीय इंटरनॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त करून श्रीरामपूर बरोबरच देशाचे नाव उज्वल केले.याबद्दल या टीमच्या सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करतो तसेच भविष्यात या खेळाडूंना कोणतीही मदत लागली तर मी ती सदैव करीन असे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी केले.काठमांडू येथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून दोन सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशनच्या सर्व खेळाडू व कोच यांचा मौलाना आझाद चौकामध्ये संविधान बचाव समितीतर्फे भव्य असा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभात डॉ.शिवपुजे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे होते तर व्यासपीठावर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना मुरकुटे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, शिवसेना नेते संजय छल्लारे, अशोक मामा थोरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर,शहर काजी मौलाना अकबर अली, डॉक्टर दिलीप शिरसाट, चरण दादा त्रिभुवन, निकम सर, अशोक उपाध्ये, दिलीप नागरे, दिलीप सानप,अयाज तांबोळी,मुन्ना पठाण, बाळासाहेब फरगडे, शेखर दुबईया, साजिद मिर्झा, शाहिद कुरेशी, फिरोज पापा, सोहेल दारूवाला, एजाज बारुदवाला, विलास खाजेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सर्वच वक्त्यांनी या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका किंवा इतर सेवाभावी संस्थांनी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. कारण आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब खेळाडू त्यांच्या अंगी गुण असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. ही अडचण सोडविण्यासाठी तसेच बास्केटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे. तो राजाश्रय नगरपालिका आणि इतर सर्व नेतेमंडळी यांनी मिळवून दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. अशोक उद्योग समूहाने बास्केटबॉल स्पर्धा पुरस्कृत करावी अशी मागणी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी याप्रसंगी केली.

श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशन गेली 39 वर्षे कार्यरत असून या कामी असोसिएशनचे संस्थापक,माजी उपनगराध्यक्ष व या टीमचे कोच हाजी मुजफ्फर शेख यांचे कष्ट प्रशसनीय आहेत. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी ही टीम तयार केली आणि त्याचे फलित म्हणून आज देशाचं नेतृत्व करण्याची संधी या टीमला मिळाली याबद्दल सर्वच वक्त्यांनी हाजी मुजफ्फर शेख यांचे कौतुक व अभिनंदन केले.

या प्रसंगी मौलाना अकबर अली, अशोक थोरे, सिद्धार्थ मुरकुटे, डॉक्टर दिलीप शिरसाठ, वंदनाताई मुरकुटे, सचिन गुजर, अहमदभाई जागीरदार, संजय छल्लारे, करण ससाने, यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. हाजी मुझफ्फर शेख यांनी श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशनची आजपर्यंतची सर्व वाटचाल, यासाठी करावे लागलेले प्रयत्न आणि नेपाळ दौऱ्याची माहिती दिली. 17, 19 व 25 वर्षाखालील वयोगटातील तिन्ही संघांनी भारत, भूतान आणि नेपाल या तीन राष्ट्रांच्या दरम्यान झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रोपे पदक प्राप्त केले.या तिन्ही टीम मधील खेळाडू

१७ वर्षाखालील टीम
नोमन शहा, फरहान खान, कमलेश देवळालीकर, अली शेख, सुफियान शेख
फुजैल शेख, ऐसाम शिलेदार, आवेज हबीब, तकी कुरेशी

१९ वर्षाखालील टीम
कैफ बागवान, फैजान शेख, सौद शेख, फैजान शेख, राज गाडगे, तबिश मुसानी, जैद तांबोळी, शाहिद पोपटिया, शिव यादव, स्तवन प्रभू, अमन शेख, नावेद शेख

२५ वर्षा खालील गट
राहिल शेख ,अब्दुलमुकित शेख, हुजैर शेख, दानियाल सय्यद, अब्दुल्ला मेमन, सनी काळे, साजिद शेख, प्रफुल्ल कहाणे, अताउल्ला पठाण व टीमचे कोच हाजी मुजफ्फर शेख, मुख्तार शेख, साजिद शेख व सादिक शिलेदार

यांचा डी वाय एस पी डॉक्टर शिवपुजे आमदार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जरिया फाउंडेशन तर्फे देखील सर्व खेळाडूंचा गुलाब पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच हाजी मुजफ्फर शेख यांचा अनेक संस्था व संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला.

नेवासा तालुक्यातर्फे नगरसेवक फारूकभाई आतार,राजूभाई शेख, फारूक कुरेशी, अहेसाम शिलेदार राजमोहम्मद शेख आदींनी सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन व आभार पत्रकार सलीमखान पठाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान बचाव समितीचे पदाधिकारी अहमदभाई जहागीरदार,साजिद मिर्झा,एजाज दारूवाला, हाजी फिरोज दस्तगीर, मुन्नाभाई पठाण,शाहिद कुरेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमापूर्वी सर्व विजेत्या खेळाडूंची कोच सह मौलाना आझाद चौकापासून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
श्रीराम मंदिर चौकात श्रीराम तरुण मंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, गौतम उपाध्ये,सोमनाथ चापानेरकर,प्रवीण इंगळे, अतुल उपाध्ये, अयाज तांबोळी, सलीमखान पठाण,राजू लचके, दिनेश अंभोरे, पंकज शिंगारे, सुनील बंड,निलेश हरकल,बाळू आदमाने,गणेश सोनवणे,महेश आकरे आदींनी स्वागत केले. नगरपालिकेसमोर माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार केला.

शिवसेनेतर्फे पंचवीस हजार
श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशनच्या सर्व उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात असोसिएशन तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे 25 हजार रुपये देणगी देण्यात येईल असे शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी जाहीर केले.

नेपाळ प्रिमीयम लिगचे निमंत्रण
काठमांडू येथे झालेल्या या स्पर्धेत प्रसंगी नेपाळचे क्रीडामंत्री उपस्थित होते त्यांनी श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशनच्या खेळाडूंचा खेळ पाहून खूप कौतुक केले तसेच नेपाळमध्ये होणाऱ्या नेपाळ प्रीमियम लीग साठी आपण यावे आपल्या टीमचा सर्व खर्च नेपाळ सरकार करील असे आवाहन केल्याचे हाजी मुजफ्फर शेख यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!