दिशाशक्ती प्रतिनिधी / रमेश खेमनर : गुरुमाऊली मंडळ २०१५ आयोजित जिल्हास्तरीय भावागीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेची अंतिम फेरी राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात पार पडली. या स्पर्धेत जि.प. प्राथ. शाळा गोटुंबे आखाडा ता. राहुरी येथील श्रीमती अनिता मोरे मॅडम यांनी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आह़े.
या स्पर्धेमध्ये जिल्हा संघांचे नेते बापूसाहेब तांबे,राजेंद्र शिंदे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे,बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे, कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर,मा. व्हा. चेअरमन विद्युलता आढाव ताई, बाबा खरात, जिल्हा सरचिटणीस मनोज सोनवणे, कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर, बँकेचे संचालक योगेश वाघमारे, माणिक कदम, विकास मंडळाचे सचिव संतोष मगर, विश्वस्त बाळासाहेब गमे व इतर मान्यवर उपस्थित होते वरील मान्यवरांच्या उपस्थितीत अनिता गायकवाड मॅडम यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल गुरुमाऊली मंडळ २०१५ व ऐक्य मंडळ, शिक्षण भारती व एकल शिक्षण मंच आघाडी राहुरी यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच गोटुंबे आखाडा जिल्हा प्राथमिक शाळेतील त्यांच्या स्टाफ व स्थानिक महिलांनी त्यांचा सत्कार केला तसेच त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आह़े.
Leave a reply