दिशाशक्ती प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वस्ती सडे, ता राहुरी, जि. अहमदनगर येथे मे.ओलोन इंडिया प्रा ली महाड यांच्या सीएसआर फंडातून तसेच ऐश्वर्या शासम फाउंडेशन आणि श्रीराम डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने १ली ते ४थी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम गांधी जयंतीचे औचित्त साधून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय आरिफ पठाण, उपाध्यक्ष जब्बार भाई पठाण, तनपुरे अण्णा, धोंडे पाटील, साळवे मामा आदी मान्यवर उपस्थित होते. सदरिल बॅगा मिळवून देण्यासाठी आमचे मित्र आदरणीय श्री दस्तगीर मुजावर (एच आर हेड, ऑनर लॅब लिमिटेड, कूरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) यांनी अथक परिश्रम घेतले.
ऐश्वर्या फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर कडाळे साहेब यांनी विशेष सहकार्य केले.मिशन आपुलकी अंतर्गत शाळेतील उपाध्यापाक श्री मंगेश पंडीत यांनी पाठपुरावा करून सदर साहित्य मिळविले.श्री.पंडीत सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री वाकडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
ओलोन इंडिया प्रा लि महाड यांच्यावतीने महादेव वस्ती येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप

0Share
Leave a reply