राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची 69 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात चेअरमन दत्तू गागरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या वार्षिक सभेमध्ये सन 2022-2023 नफा वाटणीतून सभासदांना उंच्चाकी 15% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वार्षिक सभेत दिवंगत झालेले सभासद थोर व्यक्तींना तसेच दोन दिवसांपूर्वी बेलकरवाडी येथील मृत पावलेले जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.या वार्षिक सभेमध्ये चांगदेव चोपडे,सखाहारी काकडे, धनंजय गागरे, मारूती गागरे यांनी उपस्थित झालेल्या चर्चा सत्रात सहभाग नोंदवला सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना म्हैसगाव सोसायटीचे चेअरमन गागरे यांनी समर्पक उत्तरे दिली . सभेमध्ये ठेवलेले सगळे विषय मंजूर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन ज्ञानदेव माने, संचालक बाबासाहेब हुलुळे , विलास गागरे, नानासाहेब देशमुख, जनार्धन विधाटे, दादासाहेब दाते, सवित्रा गुलदगड, नानासाहेब गागरे, जगन्नाथ मुसळे, सुनिता हुलुळे, ताराबाई आग्रे, भास्कर गागरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गहिनीनाथ हुलुळे , जेष्ठ संचालक बापुसाहेब गागरे, भानुदास गागरे, सखाहारी आग्रे खंडेराव देशमुख सचिव भागवत तनपुरे ,आमचे सहकारी पत्रकार मित्र श्री.कमलेश विधाटे व सभासद आदी मान्यवर या वार्षिक सभेसाठी उपस्थित होते.
Leave a reply