पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील कासारे येथे ग्रामविकासाची चळवळ उभी राहिली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून कासारे गावचा चेहरा बदलवला असून सोशल सेंटरच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागत आहेत.गावामध्ये कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहे. गट शेतीच्या माध्यमातून गावात आधुनिक पद्धतीने शेतकरी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत शेती करत आहेत.
कासारे हे राज्यात आदर्श गाव म्हणून नव्याने नावारूपास येत आहे. गावचे आदर्श उपक्रमशील सरपंच शिवाजी निमसे विकासाला दिशा देत आहे.नुकतेच कासारे गावामध्ये जर्मन या देशांमध्ये विद्यापीठामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आले होते. भारतीय संस्कृती, भाषा, कला, परंपरा, शेती, नैसर्गिक विविधता याचा अभ्यास करण्यासाठी ते भारतामध्ये आले होते. त्यांनी कासारे गावाला भेट दिली. यावेळी कासारेकरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारे येथील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात व लेझीमच्या तालावर त्यांची गावातून मिरवणूक काढली. आपले झालेले स्वागत पाहून जर्मनीचे विद्यार्थी भारावून गेले होते.
यावेळी कासारे गावचे आदर्श उपक्रमशील सरपंच शिवाजीराव निमसे, उपसरपंच शैलाताई घनवट, व गावातील ग्रामस्थांनी बिरोबा मंदिराच्या सभागृहामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा मान सन्मान व सत्कार केला. सरपंच निमसे यांनी यावेळी कासारे गावचा इतिहास, गावातील परंपरा, गावातील ग्रामदैवत यांची ओळख तसेच भौगोलिक दृष्ट्या गावची ओळख करून दिली.
जर्मनच्या विद्यार्थ्यांनी यावेळी ग्रामदैवतांचे दर्शन घेतले बिरोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. तसेच महादेव डोंगरावर जात गावची भौगोलिक व नैसर्गिक पाहणी त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये भरलेल्या गावातील बंधाऱ्यावर जात पाण्याचे पूजनही केले. खऱ्या अर्थाने जर्मनचे पाहुणे कासारे गावांमध्ये आल्यानंतर येथील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ व माता भगिनींनी त्यांचे जोरदार स्वागत केले व गावामध्ये एक प्रकारे दिवाळीच असल्याचे जाणवत होते.
यावेळी सरपंच शिवाजीराव निमसे, उपसरपंच शैलाताई घनवट, युवा नेते गोकुळ निमसे, सामाजिक कार्यकर्ते देवराम घनवट, तुकाराम साळवे, उत्तम साळवे, युवा नेते दत्तात्रय वाव्हळ, गुणाजी साळवे, विजय वाव्हळ, गौतम साळवे, तुकाराम पानमंद, सुदाम दातीर, लक्ष्मण नरड, विश्वनाथ दातीर, युवा पत्रकार श्रीनिवास शिंदे, पोपट नरड, भाऊसाहेब नरड, सचिन निमसे, रावसाहेब शिंदे, गजानन कासुटे, सखाराम निमसे, आकाश निमसे, ग्रामसंघ व महिला बचत गटाच्या अध्यक्षा नेहाताई वाव्हळ, जोशना चौरे, गौतमी साळवे, पुनम निमसे, जनाबाई खरात, भामाबाई पानमंद, मंजुळाबाई नरड, कल्पना निमसे, ज्योती घनवट, आदी गावातील ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या सर्वांनी जर्मनच्या विद्यार्थी पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी मेहनत घेतली.
पुरणपोळीच्या जेवणाचा घेतला आस्वाद..
तालुक्यातील नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले कासारे हे एक गाव येथे जर्मनचे विद्यार्थी संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी आले होते गावात त्यांचे महिला भगिनींनी जोरदार स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कासारे येथे गोड अशा पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला
कासारे विकासाचे आदर्श मॉडेल …
कासारे गाव हे हिवरे बाजार व राळेगणसिद्धी नंतर तालुक्यामध्ये विकासाचे मॉडेल बनत आहे भौगोलिक दृष्ट्या नैसर्गिकतेने हे गाव संपन्न आहे अनेक विकासाची कामे येथे मार्गी लागत आहेत गावचे आदर्श सरपंच शिवाजीराव निमसे यांनी गावात सामाजिक चळवळ उभी करून गावचा चेहरा मोहरा बदलला आहे.
कासारे गावच्या भेटीला जर्मनचे विद्यार्थी; गावात जोरदार स्वागत ! गावची जाणून घेतली भौगोलिक व ऐतिहासिक माहिती

0Share
Leave a reply