बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन , जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग नांदेड व टेक्नोस्पर्ट ग्रामविकास प्रतिष्ठान परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मुलींचे नवीन वस्तीगृह जिल्हा परिषद शाळेजवळ बीईओ ऑफिस शेजारी कुंडलवाडी रोड बिलोली येथे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच संपन्न झाले आहे.
प्रशिक्षणाची सुरुवात दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. प्रशिक्षणा दरम्यान चहापाण्याची सोय व उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केलेली होती,प्रशिक्षणार्थींना ट्रेनिंग किट देण्यात आल्या. या दोन दिवशीय प्रशिक्षणांमध्ये जल जीवन मिशन प्रकल्पाचा उद्देश, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांची भूमिका व जबाबदारी आणि प्रकल्पाची अंमलबजावणी देखभाल व दुरुस्ती प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित व शाश्वत ५५ लिटर पाणी देण्याचे अनुषंगाने शासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांची मुख्य भूमिका इत्यादी विषयांचे सत्राद्वारे प्रशिक्षण संस्थेचे मास्टर ट्रेनर यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले.
जलजीवन मिशन हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी नळाद्वारे नियमित उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.प्रशिक्षण कार्यक्रमास तालुक्यातील बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष नांदेड चे एचआरडी मानवतकर तसेच संबंधित बीआरसी यांनी वेळोवेळी कार्यक्रमास भेटी देऊन कार्यक्रमाची व्यवस्थापन व गुणवत्ता तपासली आणि प्रशिक्षणार्थींना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षणार्थींनी मोलाचा प्रतिसाद दिला, ज्यामुळे जल जीवन मिशन कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यास आता मदत होईल असे दिसून आले.
प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर, जिल्हा उपअधिकारी सचिन गिरी, गटविकास अधिकारी रविराज क्षीरसागर, बीईओ बालाजी पाटील, बांधकाम अभियंता चीतळे तसेच बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोणारकर साहेब उपस्थित होते, वरील मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच प्रशिक्षणाची व्यवस्था व गुणवत्तेची प्रशंसा केली. वरील प्रशिक्षण वेगवेगळ्या बॅचद्वारे विविध सत्रांमध्ये पीपीटीच्या व खेळांच्या माध्यमातून केआरसी संस्थेचे प्रशिक्षक यांच्याद्वारे प्रशिक्षणात सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी संस्थेचे प्रतिनिधी शैलेश सिसोदिया, ट्रेनिंग कॉर्डिनेटर सौ.कल्पना कुलकर्णी, टीम कॉर्डिनेटर पांडुरंग हुलेकर व टीम इत्यादी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत दोन दिवशीय अनिवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न ■ टेक्नोस्पर्ट ग्रामविकास प्रतिष्ठानचा महत्वकांक्षी उपक्रम

0Share
Leave a reply