राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बेलापूर रोडवर असलेल्या गडाखवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू तर एक गाय गंभीर जखमी झाली.बिबट्याच्या सततच्या दर्शन व जनावरांवर होणारे हल्ले यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाले आहेत. देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन घडतं असून ठिकठिकाणी जनावरांवर हल्ले होत आहे. बेलापूर रोड येथील वस्तीवरील शेतकरी गोरक्षनाथ मंजाबापू गडाख यांच्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले तर शिवाजी मंजाबापू गडाख यांच्या गायीवर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी केले आहे.
या घटनेचा तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत सदरील गडाख कुटूंबियांना मिळावी व परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गात होत असून भितीचे व वातावरण तयार झाले आहे.
Leave a reply