Disha Shakti

इतर

सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांची सर्व्हिस रिव्हलवर मधून गोळी झाडून आत्महत्या

Spread the love

सोलापूर प्रतिनिधी / बिरु खुटेकर : मूळचे सोलापूरचे आणि सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला घराकडे आले होते.

पहाटे चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मिळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते.

घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!