देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सूरनर : देगलूर महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य तथा सामाजिक , शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील, उपक्रमाशील माननीय प्रा.उत्तमकुमार कांबळे सर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सिद्धेश्वर फॅमिली रेस्टॉरंट अॅन्ड लॉन्स, मजगे नगर, उदगीर रोड देगलूर येथे संपन्न झाला.या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाश पाटील बेंबरेकर साहेब हे उपस्थित होते. तर कार्यकारणी सदस्य जनार्धनशेठ चिद्रवार, देवेंद्र शेठ मोतेवार, रवींद्र आप्पा द्याडे भाजपा तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रवार पर्यवेक्षक प्रा.संग्राम पाटील व सर्व प्राध्यापक ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वजण उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमाने झाला वाढदिवस कार्यक्रम उत्साहात साजरा झाला त्यामध्ये मग , देशात उद्भवलेल्या कोरोना सारख्या महामारी मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य खात्यामधील कर्मचाऱ्यांना आणि पोलीस बंधूंना पीपीटी किट व माक्सचे वाटप करून, गोरगरीब लोकांना सिधा तसेच झोपडपट्टीमध्ये कपडे रूपे धान्यरूपी मदत करून विविध उपक्रमाने ते वाढदिवस साजरे करतात.
या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी सरांना भावी आमदार म्हणून भाजपा पक्षाकडून उमेदवारी देण्यासंदर्भात मी वरिष्ठांशी चर्चा करेल अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या .तर भाजपा शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड यांनी मी सरांचा अकरावीपासून विद्यार्थी आहे. सरांनी विद्यार्थी दशेमध्येच मला अभ्यास कसा करावा. या संदर्भात धडे दिलेले आहेत. त्यामुळे मी सरांना उच्च पद स्थानी गेल्याचे पाहू इच्छितो यासंदर्भात त्याने वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या .त्याच बरोबर कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन खताळ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
या मनोगतामध्ये उत्तमकुमार कांबळे सरांसारखा उत्कृष्ट कार्यकर्ता, अभ्यासू शिक्षक आणि एक सच्चा तळमळीने कार्य करणारा समाजसेवक आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांना भावी काळामध्ये दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या तर या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या मनोगतामध्ये सरांनी देगलूर महाविद्यालय देगलूर हाच माझा परिवार आहे. या महाविद्यालयामुळेच मी आज हे सुयश संपादन करू शकलो आहे .त्या देशामध्ये माझा शैक्षणिक आलेख, सामाजिक आलेख आणि राजकीय आलेख हा सातत्याने वाढतच गेलेला आहे.
या परिवारामधील संपूर्ण अडत व्यापारी शिक्षणा संस्थेचे माननीय अध्यक्ष साहेब ,सचिव साहेब आणि सर्व कार्यकारणी सदस्य ही सातत्याने माझ्या पाठीशी उभे आहे.त्यांनी मला आतापर्यंत शिक्षक प्रतिनिधी आणि आता उपप्राचार्य पद देऊन सेवा करण्याची संधी देऊन माझ्या पाठीशी सतत्याने सहकार्य केले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत महाविद्यालयाचे जे काही प्राचार्य पदावरील व्यक्ती होते. त्यांनी मला वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची संधी दिली होती. त्यामध्ये मग अस्मिता दर्श साहित्य संमेलन असेल किंवा माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना येथे कार्यक्रमानिमित्ताने बोलवण्याचे काम असेल किंवा रीडोलसच्या माध्यमातून विधानसभा आमदारकीचा उमेदवार असेल हे सर्व सामाजिक कार्य मी माझ्या संस्थेच्या पाठ्यबळावरच करू शकलो .असे मनोगत सरांनी आपल्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त मनोगतच्या माध्यमातून व्यक्त केले. सर्व उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर पञकार यांनी कांबळे सरांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचा समारोप हा संस्थेचे कार्यकारी सदस्य देवेंद्रशेठ मोतेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून केला.
मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रा.उत्तमकुमार कांबळे हे एक उपक्रमशील प्राध्यापक तर आहेतच पण त्यांना मी आमच्या देगलूर नगरीचे भावी आमदार म्हणून समजतो .अशा प्रकारचे आपले मत व्यक्त केले आणि सर निश्चितच आमदार होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षच्या वतीने शुभेच्छा देताना व्यक्त केल्या. या सर्व कार्यक्रमानंतर सर्व सहकार्य बंधूनी अगदी छान अशा सुरूची भोजनाचा आस्वाद घेतला.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सहकारी बंधू प्रा. डॉ . शेरीकर,प्रा.एकनाथ पाटील प्रा.अभय कळसकर ,प्रा.शेख यादूल,प्रा.डाॅ.धनराज लझडे,प्रा.महेश कुलकर्णी प्रा.गौतम भालेकर, प्रा.प्रमोद गुजे, प्रा.कपिल तोटावार, प्रा.शिवचरण गुरूडे, प्रा.शिवानंद सुर्यवंशी प्रा.संतोष वानोळे, प्रा.एस.आर. हाके भिम कर्णे,दिपक संगमकर यांनी केले होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ.व्हि.जी. शेरीकर यांनी केले. अशा प्रकारे या कार्यक्रमाची संपन्नता अगदी आनंदमय वातावरणामध्ये झाली.
Leave a reply