राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यात कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजने अंतर्गत ६ कोटी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित असे एकूण ६० प्रकल्प मंजूर झाले असून त्यासाठी pmfme योजनेअंतर्गत ३५ टक्क्याप्रमाणे १ कोटी ९८ लाख ४७ हजार ३०३ रुपये अनुदान वैयक्तिक लाभार्थी, महिला बचत गट,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था यांच्या नावे जमा झाले. नगर जिल्ह्यात या योजनेच्या कामगिरीत राहुरी तालुका दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजने (pmfme) अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत कृषी कच्चामाल मूल्यवर्धन व विपणनसाठी लागणाऱ्या मशिनरी,उपकरणे, व्यवसायाच बांधकाम आदींसाठी कृषी विभागामार्फत प्रकल्प मूल्याच्या ३५ टक्के अनुदान देण्यात येते.मार्केटिंग व ब्रँडिंग या बाबीसाठी ५० टक्के शासकीय अनुदान देण्यात येते.
राहुरी तालुक्यात ६ कोटी १६ लाख ६८ हजार रुपयांचे खर्च अपेक्षित असे ६० प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यासाठी ३५ टक्क्याप्रमाणे १ कोटी ९८ लाख ४७ हजार ३०३ रुपये अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी,महिला बचत गट, शेतकरी गट यांच्या नावे आज अखेर जमा झाले आहे. २५ प्रकल्प बँक प्रक्रियेत प्रलंबित आहेत. सदर लाभार्थी,संस्थांना लवकरच अनुदान मिळेल.
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी महिला बचत गट, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांनी अनुदान मिळण्यासाठी राहुरी तालुका कृषी विभागाकडे संपर्क करून अर्ज करावेत असे आव्हान तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी वैयक्तिक लाभार्थी, महिला बचत गट,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांना प्रक्रिया उद्योगासाठी संधी उपलब्ध आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
Leave a reply