राहुरी प्रतिनिधी /नाना जोशी : राहुरी तालुक्यातील दवणगाव शिवारातील शेतकरी दत्तात्रय सिताराम डुकरे यांच्या शेतातील वस्तीवर सुर्यस्ताच्या पूर्वीच बिबट्याने बोकडाचा फडशा पाडण्याची घटना नुकतीच घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की डुकरे यांच्या पाळीव शेळ्या त्यांच्या शेताजवळ पडिक जमिनीत चरत होत्या.त्यामध्ये एक वर्षा वयाचा सुदृढ असा, बोकडा चरत होता.
सायंकाळी सहा वाजता बिबट्याने बोकडावर झडप घातल्याने जवळपासच्या शेळ्या ओरडू लागल्या.दत्तात्रय डुकरे यांचा मुलगा सिद्धार्थ डुकरे यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहताच आरडाओरडा केला.त्यामुळे जवळचे शेतकरी जमा झाले.मात्र बिबट्याने बोकडाला शेजारील राहातं असलेल्या चांगदेव खपके यांच्या ऊसाच्या शेतात ओढून बोकडाचा फडशा पाडला.तरी संबंधित वन विभागाने त्वरित योग्य ती खबरदारी घ्यावी असे मागणी दवणगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
यामध्ये वन विभागाने दवणगाव शिवरात बिबटे जेरबंद करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावले असून बिबटे यामध्ये बंदिस्त होत नसल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी दत्तात्रय डुकरे यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून पंचनामा करून भरपाई मिळावी ही विनंती केली आहे.
Leave a reply