Disha Shakti

इतर

मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत मंजूर प्रकरणास जाणिवपूर्वक वाटप करण्यास टाळाटाळ

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम २०२३ अंतर्गत मंजूर प्रकरणास जाणिवपूर्वक जातीय द्वेष भावनेतून प्रकरण वाटप करण्यास टाळाटाळ करणारा (तत्का. शाखा व्यवस्थापक) श्री. संजय भोर व सध्याचे व्यवस्थापक श्रीमती मनिषा झिने यांच्यावर कायदेशीर कारवाई होणेकामी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा राहुरी यांच्या समोर सर्व महिलां कार्यकर्त्यां समवेत आमरण उपोषण आंदोलन चालू केले आह़े. निवेदनात उपोषणकर्त्या तक्रारदार अंजली सचिन कदम यांनी म्हटले की सुशिक्षित बेरोजगार असून महाराष्ट्र शासनाची सरकारी योजना मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना २०२३ अन्वये मागासवर्गीय कोट्यातून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या MCED अंतर्गत माझे प्रकरण मंजुर होवून मी शासनाचे ट्रेनिंग (प्रशिक्षण) घेतले आणि शासनाचा आर्थिक सहाय्य योजनेतून माझे प्रकरण सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा राहुरी येथे मंजुर करुन पाठविले. प्रशिक्षण मी पूर्ण केल्यानंतर लवकरात लवकर प्रकरण वाटप होऊन मला माझा व्यवसाय सुरु करणे गरजेचे होते.

परंतू मी मागासवर्गीय महिला पैसे कसे फेडणार? असे वारंवार तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री. संजय भोर हे जातीय द्वेष भावनेतून म्हणत होते. तसेच त्यांची बदली झाल्यानंतर त्याठिकाणी आलेल्या शाखा व्यवस्थापक यांना मी प्रकरणा संदर्भात विचारपूस करण्यास गेले असता मला कायम म्हणतात भोर साहेबांनी मला प्रकरण टाळाटाळ करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शाखा व्यस्थापक श्रीमती मनिषा झिने मॅडम याही जातीय द्वेष भावनेतून मागासवर्गीय महिलेची अडवणूक करण्यासाठी आलेल्या आहेत का?… मार्च महिन्यात मी सर्व बँकेला कागदपत्रे, स्टँप, लागणाऱ्या सर्व मंजुरी देऊनही बँक मॅनेजर श्रीमती मनिषा झिने यांनी जाणून बुजून प्रकरण वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे माझे या कर्जासाठी खुप खर्च झालेला आहे.

परंतू मला शासकीय योजना मिळवण्यास अडथळा आणणाऱ्या, जातीयवादी शाखा व्यवस्थापक श्री. संजय भोर (तत्का.) व सध्याच्या व्यवस्थापक श्रीमती मनिषा झिने यांच्या विरोधात मागासवर्गीय महिलेला जाणीवपूर्वक जातीय द्वेष भावनेतून त्रास दिल्याबद्दल गुन्हे दाखल होणेकामी व मला शासकीय योजनाचा लाभ तात्काळ मिळावा सर्व सहकारी महिला कार्यकर्त्या यांच्या समवेत मंगळवार दिनांक १०/१०/२०२३ पासून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा राहुरी यांच्या दालनासमोर आमरण उपोषणास बसलो आहोत. त्यानंतर मात्र माझी व सर्वच उपोषणकर्त्यांची जबाबदारी तत्कालीन शाखा व्यवस्थापक श्री. संजय भोर व सध्याच्या व्यवस्थापक श्रीमती मनिषा झिने यांच्यावरच राहील, याची कृपया नोंद घ्यावी.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!