विशेष प्रतिनिधी /इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणांना अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली होती. याप्रकरणी सातपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नाना गलांडे गेली दीड महिन्यांपासून फरार आहे. त्याला त्वरित अटक करून त्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.
सावकारकीच्या धंद्यातून लुबाडलेल्या लोकांच्या जमिनी, दुकाने परत करा, या मागणीसाठी रिपाई व भिमशक्तीच्या वतीने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आदींनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसून शहर पोलीस ठाण्यात नेऊन अटक करून सुटका करण्यात आली.
यावेळी राजेंद्र मगर, संजय बोरगे, तनवीर शेख, यासीन सय्यद ,सनी बारसे, गुड्डू पंडित, विजय माघाडे, प्रदीप थोरात, शुभ माघाडे, मोजेस चक्रनारायण, सुमेध पडवळ, अर्जुन शेजवळ, शुभम लोळगे, सचिन खंडारे, बाप्पू विधाटे, आबा पंडित, रमेश कांबळे महिलाआघाडीच्या विजयाताई बारसे, कल्पना तेलोरे, वंदना गायकवाड आदी रिपाई व भीमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a reply