भारत कवितके / मुंबई कांदिवली : मुंबई उपनगर कांदिवली येथील भारतीय जनता पक्षाचे वार्ड क्रमांक 31 चे मा.नगरसेवक कमलेश यादव यांच्या कार्यालयाच्या बाजूला जनसंपर्क कार्यालय वेल्फेअर सेंटर,न्यू लिंक रोड, कांदिवली पश्चिम या ठिकाणी आधार कार्ड शिबीर, आणि आयुष्यमान भारत योजना कार्ड च्या शिबीराचे आयोजन भाजपचे उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त चालू असलेले आधार कार्ड नोंदणी व आयुष्यमान कार्ड शिबीर रोज सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत दररोज चालू करण्यात आले आहे.
कांदिवली पश्चिम मधील अनेक महिला व पुरुष रहिवाशी वर्गाने यांचा लाभ घेतला आहे व घेतली आहेत.या प्रसंगी या विभागातील पत्रकार साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचे आयुष्यमान भारत योजना कार्ड मा.नगरसेवक कमलेश यादव यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.यावेळी या विभागातील अनेक महिला व पुरुष रहिवाशांचे आधार कार्ड नोंदणी मधील नवीन पत्ता, मोबाईल नंबर,वय, फोटो जोडीचे कार्य व इतर बदल करण्याचे कार्य,व आयुष्यमान भारत योजना कार्ड यांचा लाभ घेताना दिसत होते.
या वेळी स्वतः नगरसेवक कमलेश यादव, शिवलाल यादव, किसनभाऊ कांबळे व इतर भाजपचे कार्यकर्ते रहिवाशांना मार्गदर्शन करीत होते.पाणी, शौचालय, दवाखाना, गटार, विद्युत वितरण, लादीकरण, एस.आर.ए.समस्या आणि आपत्ती काळात,संकट का या काळात मा.नगरसेवक या विभागातील नागरिकांच्या मदतीला धावून येतात.
मा.नगरसेवक कमलेश यादव यांच्या कार्यालयात आधार कार्ड शिबीर आणि आयुष्यमान भारत योजना कार्ड शिबीराचे आयोजन

0Share
Leave a reply