Disha Shakti

सामाजिक

हवामान तज्ञ म्हणून दत्ताभाऊ खेमनर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येतील – स्वामी अरुण नाथगिरी महाराज

Spread the love

 श्रीरामपूर प्रतिनिधी / जितू शिंदे :  श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड चे चेअरमन दत्तात्रय खेमनर यांना डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट कडून राज्यस्तरीय हवामान तज्ञ पुरस्कार 2023 जाहीर झाल्याबद्दल श्रीरामपूर येथील शासकीय विश्रांतीगृह येथे श्रीरामपूर दहीहंडी उत्सव समिती आयोजित सर्वपक्षीय नागरिक सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून स्वामी अरुण नाथगिरी महाराज उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर यांनी दत्तात्रय खेमनर यांना हवामान तज्ञ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना श्रीरामाची शॉल गुलाबाचा हार घालून भव्य असा सत्कार केला यावेळी स्वामी अरुणा थ गिरी महाराज यांनी दत्तात्रय खेमनर हे लवकरच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हवामान तज्ञ म्हणून नावारूपाला येथील असा माझा आशीर्वाद आहे असे बोले यावेळी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक त्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये दत्तात्रय खेमनर हे श्रीरामपूर चे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान तज्ञ म्हणून पोहोचवत आहे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन जी दिनकर यांनी दत्ताभाऊ खेमनर यांच्या हवामानाचा अंदाज कसे खरे ठरले याचे अनुभव सांगितले.

यावेळी उपस्थित अनेक नेत्यांनी दत्तात्रय खेमनर यांनी सांगितलेले हवामानाचा अंदाज कसे तंतोतंत खरे ठरले प्रत्येकाने आपला वेगळा अनुभव सांगितला जेवढे अनेकांनी पंजाबराव डख व मान खात्याला देखील दत्ताभाऊ ने मागे टाकले असे आपल्या भाषणातून सांगितले आम्ही अनेक हवामान तज्ञ बघितले परंतु पावसाचा तारीख वेळ आणि टाईम सांगणार हवामान तज्ञ दत्ताभाऊ खेमनर या नावाचे रसायनच वेगळ आहे असे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी सांगित ले यावेळी चला हवा येऊ द्या असे वाक्य कामगार नेते नागेश सावंत यांनी काढता सर्वत्र हशा पिकला.

यावेळी श्रीरामपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीनजी दिनकर कामगार नेते नागेश सावंत मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे आम आदमीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मा उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे पाटील जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मनोज भैया भिसे अशोक बँकेचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पाटील हळ नोर शेतकरी संघटनेचे नेते सुरेश राव ताके भाऊ बिल्डर्स अँड डेव्हलपर चे संचालक प्रसाद म्हसे पाटील भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष मोहन भाऊ आडांगळे सामाजिक कार्यकर्ते सलमान शेख शिव दशनाम गोसावी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्याम भाऊ गोसावी पांडुरंग आठरे सुमित कापसे अतुल वडने बंडू कुमार शिंदे संजय कुदनर भाग चंद्र नवगिरे प्रदीप आहेर पत्रकार संतोष बोरुडे पांडुरंग आठ रे सुमित कापसे महेश कुदनर भारत कोळेकर लक्ष्मण बाहुले पाटील लक्ष्मण काळे प्रमोद भालेराव दत्तात्रय हळनोर चेतन शिंदे आधी उपस्थित होते सूत्रसंचालन अभिजीत लिफ्टे पाटील केले आभार भैया भिसे यांनी मानले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!