बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : तालुक्यातील कासराळी गावचे भुमीपुत्र भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे विश्वासू खंदे समर्थक समजले जाणारे धडाडीचे कार्यकर्ते शेख युनूस कासराळीकर यांनी मागील कार्यकाळात पक्षात केलेल्या कार्याची दखल भाजप च्या वरिष्ठांनी घेतली असुन सलग दुसऱ्यांदा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा च्या बिलोली तालुका अध्यक्षपदी त्यांची फेर निवड करण्यात आली आहे.
समाजातील गोर गरीब व्यक्तिंच्या तसेच तळागाळातील कार्यकत्यांच्या अडी अडचणी च्या वेळी हाकेला धावुन येणारे शेख युनूस कासराळीकर यांच्या कार्याची तसेच त्यांच्या प्रति मुस्लिम समाजात असलेली लोकप्रियता लक्षात घेता भाजपा ने पुन्हा एकदा त्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे. ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकीचा त्यांना चांगला अनुभव आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकत्यांची त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी ते नेटाने सांभाळतील यात काही शंका नाही.
शेख युनूस कासराळीकर यांच्या या फेरनिवडी बद्दल भाजपा चे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर आमदार राम पाटील रातोळीकर जिल्हाअध्यक्ष संतुकराव हांबर्डे अनुसुचीत जमातीचे जिल्हाअध्यक्ष, जिल्हा चिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड , राजेंद्र रेड्डी तोटावाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत पा.सावळीकर श्रीनिवास पा.नरवाडे आदी भाजपा च्या नेते मंडळी तसेच भाजपा चे असंख्य कार्यकर्ते मित्रमंडातील अनेकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a reply