राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकार नुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ समतेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37(1)व37(3) अन्वये 26 ऑक्टोंबर 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे,गोटे, तलवारी,भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकावायची उपकरणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे,गाणे म्हणने, वाद्ये वाजवणे, ध्वनी वर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा जसाच्या तसे ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे , सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषण करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे , चिन्हे किंवा इतर वस्तु तयार करणे किंवा त्याचा प्रचार करणे.सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तिसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे,तसे प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तिंना हा आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Leave a reply