नेवासा प्रतिनिधी / अंबादास काळे : नेवासा फाटा येथे जागेच्या वादातून पत्रकार संपादक यांना झालेली मारहाण ,व शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना बाबत आज नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तसेच सकल हिंदू समाज राम राज्य उत्सव समिती ,राम राज्य ग्रुप च्या वतीने नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.
आरोपी गणेश माटे ,पठाण मिस्तरी, व अन्य समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली ,तसेच अशा घटना ची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घेण्याची मागणी केली, तसेच पत्रकार संपादक बादल परदेशी यांनी दाखल केलेला गुन्हा, व अतिरिक्त गुन्हा महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदे कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त पत्रकार संपादक यांनी केली.
यावेळेस दैनिक लोक परिवर्तन चे आबासाहेब शिरसाठ, लोकदवंडी चे संपादक विकास भागवत, न्यूज नाईन चे शंकर नाबदे, पत्रकार सचिन कुरुंद, पत्रकार मकरंद देशपांडे, पत्रकार रमेश राजगिरे, महाराष्ट्र न्यूज प्रिन्सचे संपादक बादल परदेशी, बजरंग दल चे संतोष पंडुरे ,महादेव ननवरे,स्वप्निल नाबदे, सुनील धोत्रे ,माऊली तोडमल, हिरामण धोत्रे, उमेश ठाणगे, पप्पू परदेशी, कृष्णा परदेशी, सार्थक परदेशी, ऋतिक दगडे, शुभम दगडे ,योगेश मिसाळ, किशोर बोरकर, मनोज हापसे, काळू हलवणे, किरण जाधव , अजय शेगर ,अण्णा नवनाथ गायकवाड , कोकणे दादासाहेब गुलाबराव, स्वप्निल मापारी, सागर जाधव, अंकुश एरंडे ,जोशी, संदीप लष्करे, भारत जाधव, शुभम टेकवडे, सह आदींच्या सह्या निवेदनावरती आहे.
तसेच यावेळेस राम राज्य उत्सव समिती रामराज्य ग्रुपचे पदाधिकारी ,व संघटनेचे कार्यकर्ते व पत्रकार संपादक मोठ्या प्रमाणात निवेदन देता वेळेस उपस्थित होते.
पत्रकार संपादक यांना मारहाण व शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबनेच्या निषेधार्थ नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन

0Share
Leave a reply