वसंत रांधवण / विशेष प्रतिनिधी (अहमदनगर) : मी केलेल्या कामाच्या व तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा कागदपत्रासहित समोरासमोर घेऊन बसा. मग सांगतो, माझ्या निधीतील कामे कोणती व तुम्ही केलेली कामे कोणती, असे आव्हान आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता दिले.
काम करण्यापेक्षा गप्पा मारून लोकांना वेड्यात काढण्याचे प्रमाण जास्त आहे. जिल्हा परिषदेच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता चोरून आणतात व स्वतःच्या नावावर खपवतात. दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेत नारळ फोडणाऱ्यांची टोळी जिल्ह्यात फिरत आहे.
मी केलेल्या कामाच्या व तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा कागदपत्रासहित समोरासमोर घेऊन बसा. मग सांगतो, माझ्या निधीतील कामे कोणती व तुम्ही केलेली कामे कोणती, असे आव्हान आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता दिले. निमगाव वाघा ते चास व भोयरे पठार या रस्त्यांच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अरुण फलके, भारत फलके, गोकुळ जाधव, अरुण कापसे, संजय जपकर, अनिल डोंगरे, संजय जपकर, वसंत पवार, डॉ. विजय जाधव, अजय लामखडे, गणेश साठे, शिवा होळकर, वसंत पवार, अण्णा जाधव, बाबा टकले, श्रीनिवास घुगे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. लंके म्हणाले, निमगाव वाघा येथे आतापर्यंत १० कोटी रुपयांची कामे केली. आजच्या कार्यक्रमाला सर्व पुढारी एकत्र आले आहेत.
कुणी कामे केली, हे लोकांना माहीत आहे. सध्या कशाचाच भरोसा नाही. कधी कामे मंजूर होतात व कधी कट होतात,याचा भरोसा नाही. आता या सरकारचाही भरोसा राहिला नाही. काही लोक फक्त कामे केल्याच्या गप्पा मारतात. नांदगाव शिंगवे येथे साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. टेंडर, वर्क ऑर्डर पाठपुरावा सर्व कागदपत्रांची पूर्तता मी केली. मात्र त्या कामाचा नारळ परस्पर फोडून लोकांची त्यांनी दिशाभूल केली. असे प्रकार सध्या नगर जिल्ह्यात चालू आहेत. नारळ फोडणाऱ्यांची टोळीच सध्या नगर जिल्ह्यात फिरत आहे.
लोकांना सध्या मोठ्या लोकांचे लगेच खरे वाटते. मात्र माझ्यासारख्यांनी कितीही ओरडून सांगितले तरी खरे वाटणार नाही. मी केलेल्या कामांच्या व तुम्ही केलेल्या कामांचा लेखाजोखा कागदपत्रासहित समोरासमोर घेऊन बसा. माझ्या निधीतून मंजूर झालेली कामे व तुम्ही केलेली कामे याचा हिशेब जनतेसमोर मांडू, असे खुले आवाहन लंके यांनी दिले.
Leave a reply